Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन सोनम कपूरला निर्लज्ज म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अनिल कपूरने दिले सडेतोड उत्तर म्हणाला...

सोनम कपूरला निर्लज्ज म्हणणाऱ्या नेटकऱ्याला अनिल कपूरने दिले सडेतोड उत्तर म्हणाला…

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड (Bollywood)अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor)नेहमीच त्याच्या लूकमुळे सतत लाईम-लाईट किंवा चर्चेच्या झोतात असतो. त्यामुळे त्याला अेकदा ट्रोलर्सच्या टीकेला देखील सामोरे जावे लागले आहे. अलीकडेच अनिल कपूरने त्याला ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना सुनावले आहे. अनिल कपूरने अरबाज खानचा (Arbaaz Khan)टॉक शो ‘पिंच’ च्या दुसऱ्या सीझनमध्ये नुकतीच हजेरी लावली होती. यादरम्यान, अरबाज खानने अनिल कपूरला ट्रोल करणाऱ्यांना काय उत्तर देशील असा प्रश्न विचारला आणि याचे उत्तर अनिलने अत्यंत मजेशीर झकास अंदाजात दिले आहे

अरबाज खानच्या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ज्यात अनिल कपूर आणि अरबाज खान मजेदार गप्पा- गोष्टी करताना दिसत आहेत. या प्रोमो व्हिडिओच्या सुरुवातीला अरबाज खानने अनिल कपूरला एक ट्वीट वाचून दाखवले, ज्यामध्ये लिहिले आहे, ‘काहीही ट्विट करण्यापूर्वी विचार करा, तुम्ही तुमच्या वैयक्तिक मॅसेजिंग सिस्टमध्ये नाही आहात’. अरबाजने ही कमेंट वाचल्यानंतर अनिल कपूरने उत्तर दिले की, ‘एकच जीवन आहे, आता मी या सर्व गोष्टी गांभीर्याने घेतल्या तर मी कसे जगू?

- Advertisement -

यानंतर, अरबाज खान सोनम कपूर आणि अनिल कपूरच्या फोटोंबाबत ट्रोलर्सने दिलेल्या प्रतिक्रिया वाचून दाखवतो. ‘मला वाटते की वडील आणि मुलगी दोघेही निर्लज्ज आहेत, जे पैशासाठी काहीही करू शकतात.’ अनिल कपूर या कमेंटला अतिशय शांतपणे उत्तर देताना दिसत आहे. अनिल कपूर म्हणाला, ‘जर त्याने अशी कमेंट केली असेल, तर कदाचित तो वाईट मूडमध्ये असेल किंवा दुःखी असेल.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Arbaaz Khan (@arbaazkhanofficial)

- Advertisement -

पुढे, अरबाज खान अनिलला त्याच्या तारुण्याचे रहस्यही विचारतो. या प्रश्नाचे उत्तर अनिल कपूरने एका गाण्याची ओळ गाऊन दिले आहे. ‘वो गीत है ना बहत दिया दे वाले, आंचल में नही समया.’ त्याचवेळी, अरबाज खान त्याला बालदिनाच्या दिवशी अनिल कपूरवर तयार करण्यात येणाऱ्या मिम्सबद्दल विचारतो, याला उत्तर देताना अनिल कपूर म्हणतो, ‘आज मी तुझ्या शोमध्ये मुंडन करुन आलो आहे.’ हा प्रोमो बघून असे वाटते की, हा भाग खूप मजेदार असणार आहे.


हे हि वाचा – ‘जीने के हैं चार दिन’ गाण्यावर भाईजानने चाहत्यांसोबत केला धमाकेदार डान्स

- Advertisement -