घरमनोरंजन66 व्या वर्षात अनिल कपूरचं 110 डिग्री सेल्सिअस मध्ये workout

66 व्या वर्षात अनिल कपूरचं 110 डिग्री सेल्सिअस मध्ये workout

Subscribe

बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या अभिनयाचे आजही लाखो चाहते आहेत. वयाच्या 66 व्या वर्षी अनिल कपूर तितकेच फिट आहेत. अशातच सोशल मीडियावर नुकत्याच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

अनिल कपूर यांनी केला मायनस 110 डिग्री सेल्सिअस तापमानात व्यायाम

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. ज्यात ते मायनस 110 डिग्री सेल्सिअस तापमानात व्यायाम करताना दिसत आहेत. तसेच त्यांनी मास्क घातलेला आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये ते रुमबाहेर येताना दिसत आहेत, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये ते रुममध्ये मायनस 110 डिग्री सेल्सिअस तापमानात व्यायाम करत आहेत. या पोस्टखाली त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “40 मध्ये खोडकर होण्याची वेळ गेली. आता 60 मध्ये सेक्सी होण्याची वेळ आली आहे. #fightermodeon” अनिल कपूरच्या या पोस्टवर सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत अनेकजण कमेंट्स करत आहेत.

- Advertisement -

एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय की, हेच तुमच्या चिरतरुण दिसण्याचं रहस्य आहे. तर दुसऱ्याने कमेंटमध्ये अनिल कपूर यांची पत्नी सुनीता यांना टॅग करत कृपया यांना नियंत्रित करा असं लिहिलं आहे.

अनिल कपूर यांचे आगामी चित्रपट

अनिल कपूर लवकरच सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अनिल कपूर हा रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाचाही एक भाग आहे, ज्याचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा करत आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

त्याची तेवढी लायकी नाही… रणबीर कपूरला उर्फी जावेदचं सडेतोड उत्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -