घरमनोरंजनAnimal मधील रश्मिकाचा Dialogue आहे तरी काय?

Animal मधील रश्मिकाचा Dialogue आहे तरी काय?

Subscribe

Animal या चित्रपटात नॅशनल क्रश म्हणून जिची ओळख आहे ती रश्मिका रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली आहे.पण या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर रश्मिकाच्या यामधील डायलॉगची चर्चा रंगली आहे. रश्मिका मंदनाने नक्की यामध्ये कोणता डायलॉग बोलली आहे ?

Animal या चित्रपटात रश्मिका मंदाना म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने रणबीर सोबत काम केले आहे.नॅशनल क्रश म्हणून जिची ओळख आहे ती रश्मिका रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली आहे.पण या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर रश्मिकाच्या यामधील डायलॉगची चर्चा रंगली आहे. रश्मिका मंदनाने नक्की यामध्ये कोणता डायलॉग बोलली आहे ? याबद्दल सोशल मीडियावर अनेक मिम्स सुद्धा तयार झाले आहेत.

रश्मीकाने आतापर्यंत कन्नड,तमिळ,तेलगू सोबतच आता हिंदी चित्रपटात सुद्धा स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ॲनिमल चित्रपटात अनिल कपूर हे रणवीर कपूरचे वडील दाखवण्यात आले आहेत. त्याचबरोबर रश्मिका आणि रणबीरला यामध्ये एक मुलगी सुद्धा आहे. एक आई आणि पत्नीची भूमिका निभवताना रश्मिका दिसली आहे. तिच्या हिंदीची नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीने नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : फोटोत दिसणारी’ ही’ गोड मुलगी करते चित्रपट सृष्टीवर अधिराज्य

दाक्षिणात्य चित्रपटांपैकी गीता गोविंदम,डियर कॉम्रेड, त्याचबरोबर अल्लू अर्जुन सोबतचा पुष्पा हा चित्रपट प्रचंड गाजला आहे . पुष्पा मधील तिची श्रीवल्लीची भूमिका सुद्धा प्रचंड गाजली आहे. यानंतर अमिताभ बच्चन सोबत रश्मीकाने काम केले आहे. त्याचबरोबर अनेक हिंदी चित्रपटांची ऑफर सुद्धा रश्मिकाला मिळते आहे.

- Advertisement -

ॲनिमल चित्रपटात ट्रेलरचा डायलॉग नक्की कोणता आहे ?
रश्मिका म्हणते,“तुम्हारे पापा के लिए तुम्हाला प्यार जोग नही बल्कि एक रोग है.I really wish he had died that day.” ‘ असा हा ५ सेकंदाचा डायलॉग पहिल्यांदा पाहिलात आणि ऐकलात तर अजिबात समजत नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवर जोरदार खिल्ली उडवली जात आहे.तरीही सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणबीर आणि रश्मिका स्पॉट होत आहेत. रणबीरच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा सिनेमा मानला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -