Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अनिता हसनंदानीचा 'धमाका' पहिल्यांदा दाखवला बाळाचा चेहरा

अनिता हसनंदानीचा ‘धमाका’ पहिल्यांदा दाखवला बाळाचा चेहरा

अभिनेत्री अनिता हसनंदीनीन व रोहित रेड्डी यांनी त्यांचा एक धमाकेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या मुलाची पहिली झलक पाहायला मिळणार आहे.

Related Story

- Advertisement -

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अनिता हसनंदानी ने प्रेक्षकांना नुकतीच एक गोड बातमी दिली आहे. अनिता आणि रोहित रेड्डी नुकतेच आई-बाबा झाले आहेत. ९ फेब्रुवारीला अनिताने गोंडस मुलाला जन्म दिला होता. मुलाच्या जन्माबाबतची गोड बातमी सांगताना रोहितने सोशल मिडियाद्वारे या बाळाचे काही फोटोही शेअर केले होते. पण त्यात प्रेक्षकांना बाळाचा चेहरा पाहता आला नाही. पण आता अनिता व रोहित यांनी आपल्या मुलाची झलक धमाकेदार व्हिडिओद्वारे केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anita H Reddy (@anitahassanandani)

- Advertisement -

अनिता आणि रोहितने शेअर केलेल्या मजेदार व्हिडिओची सध्या सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु असून हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये अनिताच्या बेबी बम्परवर एक फटाका काळ्या रंगात रंगवला आहे. व रोहित त्याच्या वात पेटवण्याची अॅक्शन करतो त्यानंतर पुढच्याच सेकंदाला हा फटाका फुटून अनिता आणि रोहितच्या हातात बाळ अवतरताना दिसते. यानंतरची मजेशीर गोष्ट म्हणजे तिघांचेही चेहरे फटाक्याच्या राखेने काळे झालेले दिसतात.

अनिताने चित्रपट तसेच अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे व स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. कभी सौतन, कभी सहेली , ये हे मोहब्बते, नागीन ३ या मालिकांमधील तिच्या भूमिता प्रचंड गाजल्या आहेत. २०१३ मध्ये अनिताचे रोहित रेड्डीसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या सात वर्षानंतर या जोडप्याला अपत्य प्राप्ती झाली आहे.

- Advertisement -