अंजली दमानियांनी व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ आणि उर्फीच्या वादात घेतली उडी

अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. या ट्रोलर्सला उर्फी नेहमीच सडेतोड उत्तर देतान दिसते. याच कारणामुळे अलीकडच्याच काळात उर्फीच्या कपड्यांवरुन पोलिस तक्रार देखील करण्यात आली होती. दरम्यान, मागील पाच-सहा दिवसांपासून भाजपा नेत्या चित्रा वाघ देखील उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन सतत संताप व्यक्त करत आहेत. शिवाय उर्फी देखील त्यांच्या विरोधाला सडेतोड उत्तर देत आहे. उर्फी जावेद आणि भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यातील शीतयुद्ध अद्याप संपलेलं नाही. दरम्यान, आता या वादात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली आहे.

अंजली दमानिया यांनी शेअर केलं ट्वीट
मागील पाच-सहा दिवसांपासून भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि उर्फीमध्ये सुरु असलेलं शीत युद्ध सुरुच आहे. त्यांच्या या वादावर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण चित्रा वाघ यांची बाजू घेत आहेत, तर काहीजण उर्फीला पाठिंबा देत आहेत. आता याच वादात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया उडी घेतली आहे. अंजली दमानिया यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ रीट्वीट केला आहे.

या व्हिडीओमध्ये एका भाजपा खासदाराच्या कार्यक्रमाध्ये एक महिला अश्लील हावाभाव करत नृत्य करत आहे. या व्हिडीओ शेअर करत अंजली दमानिया यांनी लिहिलंय की, “प्रिय @ChitraKWagh ताई , भाजप च्या श्री @rameshbidhuri यांची ही जन आक्रोश महासभा आहे. या बद्दल आपल्याला काय मत आहे? ह्याला आपण कुठली संस्कृती म्हणाल ? याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का?” असा टोला चित्रा वाघ यांना अंजली दमानिया यांनी लगावला आहे.

दरम्यान, याआधी या वादात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी देखील उडी घेतली होती. त्यांनी कंगना रनौत, अमृता फडणवीस, केतकी चितळे यांचे फोटो शेअर करत त्यांची तुलना उर्फीसोबत केली होती.

 


हेही वाचा :

ऋषभला पाहण्यासाठी उर्वशी पोहोचली मुंबईत; हॉस्पिटलबाहेरचा फोटो केला शेअर