ठरलं! अंजलीबाई आणि राणादा यांचा ‘या’ ठिकाणी पार पडणार विवाह सोहळा

या दोघांचे अचानक साखरपुडा झालेले फोटो पाहून सोशल मीडियावर अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. आता मात्र त्या दोघांच्या चाहत्यांना या दोघांचे लग्न कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे

नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील मुख्य कलाकार आणि प्रेक्षकांची लाडकी जोडी अंजली बाई आणि राणा दा आता खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी होणार असल्याची बातमी समोर आली होती. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा पार पडला मोठ्या थाटामाटात पार पडला होता. या दोघांचे अचानक साखरपुडा झालेले फोटो पाहून सोशल मीडियावर अनेकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. आता मात्र त्या दोघांच्या चाहत्यांना या दोघांचे लग्न कधी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीत हार्दिकने याबाबत उत्तर दिले आहे.

पुण्यात पार पडणार अक्षया आणि हार्दिकचे लग्न

 

View this post on Instagram

 

A post shared by HARDEEK JOSHI (@hardeek_joshi)

 अक्षया आणि हार्दिकच्या घरी आता त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान साखरपुड्यानंतर काही दिवसांनी अक्षया आणि हार्दिक ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्यासह शिवानी आणि विराजस सुद्धा कार्यक्रमात आले होते. या शोमध्ये अक्षया आणि हार्दिकला “लग्न कुठे करणार?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अक्षया आणि हार्दिक ‘आम्ही लग्न पुण्यात करणार’ असं म्हणाले. मात्र आम्ही वेन्यू अजून नक्की केलेला नाही. काही दिवसांपूर्वी आम्ही विराजस आणि शिवानीचे लग्न जिथे झाले, ती जागा आम्ही पाहून आलो आहोत. कदाचित आम्ही तिथे लग्न करू असं त्यावेळी अक्षया आणि हार्दिक म्हणाले होते.

कोल्हापूरवरून मागवणार लग्नाचे कपडे
त्यावेळी अक्षया आणि हार्दिक असं सुद्धा म्हणाले होते की, “आमच्या प्रेमाची सुरूवात तुझ्यात जीव रंगला या मालिकूतन झाली, ती मालिका कोल्हापूरमधील होती, त्यामुळे आम्ही आमच्या लग्नाचे कपडे तिकडूनच मागवणार आहोत”.