Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन viral video: बॉयफ्रेंड विकी जैनला अंकिताने दिली वाढदिवसानिमित्त खास भेट

viral video: बॉयफ्रेंड विकी जैनला अंकिताने दिली वाढदिवसानिमित्त खास भेट

वाढदिवसाचा एक खास व्हिडिओ अंकिताने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे

Related Story

- Advertisement -

‘पवित्र रिश्ता’फेम अंकिता लोखंडे अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत लाईम- लाईटमध्ये असते. अंकिता सोशल मीडियावरदेखील प्रचंड सक्रीय असते तिने पोस्ट केलेल्या फोटो वर चाहत्यांची चागंलीच पसंती मिळते पण अनेकदा तिला ट्रोलींगचा देखील सामना करावा लागतो. नुकतच अंकिताने तिच्या बॉयफ्रेंड विकी जैनचा वाढदिवस साजरा केला.वाढदिवसाचा एक खास व्हिडिओ अंकिताने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता विकिला ॲपलचे एयरपॉड्स गिफ्ट करतांना दिसत आहे. सध्या या व्हिडिओनो सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ माजवला आहे.अंकिताने व्हिडिओ शेअर करत “येणारवर्ष तुझ्यासाठी खास आहे आणि ते माझ्या सोबत आहे. मी वचन देते की मी तुझ्या सुखात आणि दु:खात सदैव तुझ्या सोबत राहीन.” असं कॅप्शन दिलं आहे. सध्या सगळीकडे अंकिताच्या या व्हिडिओची तसेच अंकिताने दिलेल्या स्पेशल गिफ्टची चर्चा रंगत आहे.

व्हिडिओ पाहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

- Advertisement -

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत अंकिता सुशांत सिंह राजपूत सोबत प्रमुख भूमिकेत होती. ‘पवित्र रिश्ता’ व्यतिरिक्त अंकिता ‘एक थी नायका’ आणि ‘शक्ति-अस्तित्व के एहसास’ यांसारख्या मालिकेत तिने काम केले आहे. गेल्या वर्षी अंकिताने कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘बागी ३’मध्ये अंकिता दिसली होती.


- Advertisement -

हे हि वाचा – Tigr3: सलमान खानला टक्कर देण्यासाठी इमरान खान जिममध्ये गाळतोय घाम

- Advertisement -