घरताज्या घडामोडीAnkita - vicky Jain Wedding: साडी सावरत अंकिताचा सासरी गृहप्रवेश, पाहा...

Ankita – vicky Jain Wedding: साडी सावरत अंकिताचा सासरी गृहप्रवेश, पाहा व्हिडीओ

Subscribe

'कूल' वधू म्हणून अंकिताला सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळाली

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विक्की जैन यांच्या शाही विवाहसोहळ्यानंतर (Ankita – vicky Jain Wedding )  अंकिताने जैन कुटुंबात नवी नवरी म्हणून गृहप्रवेश केला आहे. अंकिताच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ अंकिताने सोशल मीडियावर शेअर केला. गृहप्रवेशावेळी विक्की जैन आणि अंकिताची केमिस्ट्री पुन्हा एकदा दिसून आली. गृहप्रवेश करण्यासाठी विक्की अंकिताला साडी सावरायला मदत करताना दिसला. गृहप्रवेशासाठी अंकिताने निळ्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती तर विक्की अगदी साध्या फॉर्मल्समध्ये होता. अंकिताने घराच्या भिंतीवर हळदीच्या हाताने छापा उमटवला. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने अंकिताचा गृहप्रवेश झाला. दोघांनी घरात प्रवेश करताच मोठ्यांचे आशिर्वाद घेतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

- Advertisement -

१४ डिसेंबरला अंकिता आणि विक्की यांचा मुंबईत शाही विवाह सोहळा पार पडला. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळींनी दोघांच्या लग्नाला हजेरी लावली होती. मेहंदी,हळद, संगीत, लग्न असा साग्रसंगीत लग्नसोहळा रंगला. अंकिताने लग्नाचे सगळे विधी फार आनंदाने पार पाडले. ‘कूल’ वधू म्हणून अंकिताला सोशल मीडियावर प्रचंड पसंती मिळाली.

लग्नानंतर अंकिताचा वाढदिवस साजरा झाला.  अंकिताचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस विक्की आणि अंकिताच्या मैत्रिणींनी थाटात साजरा झाला. अंकिताने वाढदिवसासाठी सिव्हलेस ब्लॉऊज आणि फ्लावर प्रिंटेड साडी नेसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

- Advertisement -

आतापर्यंत बॉलिवूडमधील अंकिता ही पहिली नवरी आहे जिने तिच्या लग्नात प्रचंड धम्माल केली. अंकिताने इतकी धम्माल केली की तिच्या पायाला किंचीत दुखापत देखील झाली. मात्र तरीही अंकिताचा उत्साह क्वचितही कमी झालेला दिसला नाही.

अंकिता आणि विक्कीच्या लग्नात त्यांनी घातलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने अंकिताचा लग्नातील गोल्डन लेहंगा डिझाझन केला होता. अंकिताचा लेहंगा तयार करण्यासाठी तब्बल १६ तास लागले होते.


हेही वाचा –

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -