Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Boycott pavitra rishta 2 म्हणणाऱ्या ट्रोलर्सला अंकिताने दिलं परखड उत्तर

Boycott pavitra rishta 2 म्हणणाऱ्या ट्रोलर्सला अंकिताने दिलं परखड उत्तर

जर काही लोकांना मी आवडत नसेल तर मला काही फरक पडत नाही पण चाहत्यांनी प्रत्येकाच्या पोस्टवर कमेंट करण्यापूर्वी विचार करायला हवा.

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande)आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘पवित्र रिश्ता’ (Pavitra Rishta)या मालिकेपासून केली होती. तिच्या पहिल्या शोमधूनच अंकिताने घरोघरी स्वतःची ओळख निर्माण केली होती. या शोमध्ये अंकितासोबत सुशांत सिंह राजपूत(Sushant Singh Rajput) मुख्य भूमिकेत दिसला होता. आता या शोचा सीझन 2 येणार आहे.पवित्र रिश्तामध्ये अंकिता लोखंडे अर्चना आणि सुशांत मानवच्या भूमिकेत दिसले होते. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या शो दरम्यान, त्यांची मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण 2016 मध्ये दोघेही व्यक्तीगत कारणामुळे वेगळे झाले. यानंतर सुशांतच्या मृत्यूनंतर सर्वांनाच धक्का बसला दरम्यान अंकिताला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं.

सुशांतच्या मृत्यूनंतर होणाऱ्या ट्रोलिंगवर अंकिता आता उघडपणे बोलली आहे. अंकिताने अलीकडेच पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला माहित नाही की मी काय चूक केली आहे. जे लोक मला ट्रोल करत आहेत,मला याबद्दल काहीच कल्पना नाही आणि ते ठीक आहे. मला वाटते लोकांचा स्वतःचा आवाज आहे. माझे अकांऊट ओपन आहे ज्यामुळे लोक काहीही लिहू शकतात परंतु ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहात त्याच्या प्रवासाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

- Advertisement -

अंकिता पुढे म्हणाली- जर काही लोकांना मी आवडत नसेल तर मला काही फरक पडत नाही पण चाहत्यांनी प्रत्येकाच्या पोस्टवर कमेंट करण्यापूर्वी विचार करायला हवा. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बहिष्कार पवित्र रिश्ता 2 च्या ट्रेंडवर अंकिता म्हणाली मला अशा लोकांची सहानुभूती वाटते कारण ते खरे सुशांतचे फॅन आहे आणि त्याच्यासाठी लढत आहे, म्हणून हा शो फ्लॉप होईल असे म्हणल्यास मला हरकत नाही. कारण ते सुशांतवर आजही प्रेम करतात.

- Advertisement -

पवित्र रिश्ता 2 ओटीटी प्लॅटफॉर्म प्रीमियर होणार असून मानव आणि अर्चना पुन्हा एकदा मनोरंजन करण्यास सज्ज होत आहे तसेच हा शो 15 सप्टेंबरपासून झी 5 वर प्रीमियर होणार आहे.


हे हि वाचा – Bigg Boss Ott मध्ये अभिनेता करण कुंद्राची होणार एंट्री

- Advertisement -