घरताज्या घडामोडीBigg Boss 15: अंकिता लोखंडे आणि रिया चक्रवर्ती बिग बॉसमध्ये दिसणार!; सुशांतबाबत...

Bigg Boss 15: अंकिता लोखंडे आणि रिया चक्रवर्ती बिग बॉसमध्ये दिसणार!; सुशांतबाबत अनेक खुलासे होण्याची शक्यता

Subscribe

कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसबाबत चाहते खूप उत्सुक आहेत. सलमान खान या शोचा होस्ट असल्यामुळे हा शो अनेकांना खूप आवडतो. माहितीनुसार, आता बिग बॉसच्या सीझन १५साठी मेकर्सने सेलिब्रिटीजना अप्रोच करण्यास सुरुवात केली आहे. मेकर्सने यावर्षी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि रिया चक्रवर्ती या दोघांना बिग बॉस सीझन १५मध्ये सहभागी होण्यासाठी अप्रोच केल्याचे समोर आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, बिग बॉसच्या मेकर्सने रिया चक्रवर्तीसोबत शोमध्ये भाग घेण्यासाठी संपर्क केला आहे. रिया शोमध्ये एन्ट्री घेण्यास तयार झाली तर मेकर्स अंकिता लोखंडेला पण अप्रोच करणार आहे. त्यासाठी ते पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. दरम्यान दोन्ही अभिनेत्री दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यामुळे जर दोन्ही अभिनेत्री बिग बॉसच्या घरात आल्या तर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत येईल आणि अनेक खुलासे होतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

- Advertisement -

माहितीनुसार, बिग बॉसच्या सीझन १५ साठी मेकर्सने अभिनेत्री दिशा वकानी, दिशा परमार, सुरभी चंदना, कृष्णा अभिषेक, नेहा मर्दा, जेनिफर विंगेटला अप्रोच केले आहे. याशिवाय, अदा खान, तेजस्वी प्रकाश, निकेतन धीर आणि अभिजीत सावंत सारखे अनेक नावे या लिस्टमध्ये सामील आहेत, असे म्हटले जात आहे. गेल्या सीझनची विजेती रुबीना दिलैक होती आणि फर्स्ट रनर-अप राहुल वैद्य होता.


हेही वाचा – ‘या’ मराठी दिग्दर्शकाच्या ‘सत्यनारायण की कथा’ चित्रपटात दिसणार कार्तिक आर्यन

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -