Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या वर्षपूर्ती आधीच अंकिताचा सोशल मीडियाला राम राम!

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या वर्षपूर्ती आधीच अंकिताचा सोशल मीडियाला राम राम!

किताने सुद्धा याच दिवशी सोशल मीडियापासून ब्रेक घेतल्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत.

Related Story

- Advertisement -

 

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने संपूर्ण बॉलिवूडचं नाही तर देश हादरले होते. काही दिवसातच सुशांतच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. आणि अशातच त्याची पूर्व प्रेयसी अभिनेत्री अंकिता लोखंडेने सोशल मीडिया अकाऊंट काही दिवसांकरिता बंद केले असल्याची माहिती समोर आली आहे. अंकिताने तिच्या इंस्टा अकाऊंट वर एक फोटो शेअर करत त्यावर नोट लिहाली असल्याचे दिसत आहे. अंकिताने अचानक केलेल्या या पोस्ट मुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे आणि तसेच अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.

अंकिताने पोस्ट मध्ये काय लिहलं आहे.
- Advertisement -

अंकिताने पोस्ट मध्ये लिहले आहे की,”हा निरोप(goodbye) नाही. मी तुम्हाला सर्वांना काही काळानंतर भेटेल” अंकिताच्या या पोस्टने अनेक लोकं गोंधळून गेली आहेत. तसेच अनेकांनी तिला टोमणा देखील मारला आहे. एका युजरने तर असे सुद्धा लिहले आहे की,” सुशांतची पुण्यतिथी जवळ येत आहे,सुशांतच्या नावाने आधीच लोकांची खूप पब्लिसीटी मिळाली आहे. म्हणून आता अंडरग्राऊंड होत आहे. नंतर कमबॅक करूया.” लोकांनी अंकिताला सोशल मीडियावरुन  ब्रेक घेण्याचे कारणसुद्धा विचारले. तसेच सुशांतच्या पुण्यतिथीच्या दिवशी ट्रोलिंग पासून वाचण्यासाठी तिने ब्रेक घेतला आहे असे बोलण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

- Advertisement -

तसेच सुशांतने आजच्या दिवशीच म्हणजेच 3 जून 2020 रोजी सोशल मीडियावर शेवटची पोस्ट केली होती. त्याने आपल्या आई सोबत फोटो शेअर केला होता. अशातच अंकिताने सुद्धा याच दिवशी सोशल मीडियापासून ब्रेक घेतल्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत.


हे हि वाचा –  गायिका नीति मोहनने दिला गोंडस मुलाला जन्म,सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

- Advertisement -