घरताज्या घडामोडीAnkita Lokhande Vicky Jain Wedding: अंकिता आणि विक्की जैन राजस्थानी थाटात विवाहबद्ध,...

Ankita Lokhande Vicky Jain Wedding: अंकिता आणि विक्की जैन राजस्थानी थाटात विवाहबद्ध, पहा फोटो

Subscribe

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा बॉयफ्रेंड विक्की जैन यांचा शाही विवाह सोहळा (Ankita Lokhande Vicky Jain Wedding)  मुंबईत पार पडला. गेली अनेक दिवस दोघांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर अंकिता विक्कीसोबत पवित्र नात्यात बांधली गेली. मंगळवारी संध्याकाळी विक्की अंकिताचा राजस्थानी पद्धतीने शाही विवाह सोहळा पार पडला. शंख नाद घंटानाद आणि मंत्रोच्चारात दोघांचे लग्नाविधी पार पडले. दोघांनी राजेशाही थाटात एकमेकांना वरमाला घातल्या. दोघांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यात नवरीच्या वेशातील अंकितामे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अंकिताने लग्नाच्या प्रत्येक विधीला तिने वेगळी थीम ठेवली होती. अंकिता विक्की लग्नासाठी राजस्थानी लुक केला होता. अंकिताने गोल्डन कलरचा लेहंगा, गळ्यात राजस्थानी पद्धतीचा भारी कुंदन हार घातला होता. कपाळावर राजस्थानी पद्धतीचा मांग टिका, केसात फुलांच्या माळा, हातभर चुडा आणि डोक्यावर घंघुट घेत अंकिताने लग्नमंडपात एंट्री घेतली. तर विक्की देखील राजस्थानी पद्धतीची शेरवानी, डोक्यावर फेटा, गळ्यात राजेशाही मोत्याच्या माळा घातल्या होत्या. राजेशाही थाटात एका गाडीतून विक्कीने लग्नमंडपात एंट्री घेतली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Web Khabristan (@webkhabristan)

- Advertisement -

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

लग्नाच्या सगळ्या विधी दोघांनी फार आनंदाने केल्या. अंकिता आणि विक्की भगवान विष्णू यांची पूज करत त्यांच्या सहजीवनासाठी आशिर्वाद मागितले. दोघांच्या लग्नासाठी खास मंडप तयार करण्यात आला होता. संपूर्ण स्टेज लाल आणि सफेद फुलांनी सजवण्यात आला होता. अंकिताने राजस्थानी पद्धतीत डोक्यावर घुंघट घेतच मंडपात एंट्री केली. अंकिताचा खास डिझायनर लेहंगा पाहून मंडपातील सर्वच जण अवाक झाले. दोघांची जबरदस्त केमिस्ट्री त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक विधीमधून दिसून आली.


हेही वाचा – बी ग्रेड चित्रपट ते विक्की कौशलची पत्नी, असा आहे कतरीनाचा बॉलीवूड प्रवास

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -