हिंदी टेलिव्हिजनवरील ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अंकिता लोखंडे अलीकडे विविध कारणांमुळे चर्चेत असते. अशातच, अंकिताचे वडील शशिकांत लोखंडे यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. शशिकांत यांचे वयाच्या 68 व्या वर्षी 12 ऑगस्ट रोजी सकाळी दीर्घ आजारापणाने निधन झाले.
आज 13 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, याबाबत अंकिताच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वीच ‘फादर्स डे’च्या निमित्ताने अंकिताने वडीलांसाठी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्यांचा हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ तिने शेअर केला होता. सोबतच तिने मोठे कॅप्शन देखील लिहिले होते. माझ्या पहिल्या हिरो माझ्या वडिलांना ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा. मला तुमच्याबद्दल काय वाटते हे शब्द मी व्यक्त करु शकत नाही. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. मी लहान असताना तुम्हाला बऱ्याच गोष्टींसाठी संघर्ष करताना पाहिले आहे. परंतु तुम्ही तुमच्या मुलांना याची खात्री दिली आहे. धडपड करू नकोस. तुम्ही मला नेहमी उडण्यासाठी पंख दिले आणि मला जे करायचे आहे ते करू दिले.” यांसारखे बरेच काही अंकिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते.
दरम्यान, त्यानंतर तिचे बाबा बरे झाल्याचे देखील सांगितले होते. शिवाय वडिलांसाठी प्रार्थना केल्याबद्दल तिने अनेकांचे आभार देखील मानले होते. मात्र, आता त्यांच्या निधनाची बातमीने अनेकजण शोक व्यक्त करत आहेत.