सोशल मीडिया इन्फ्लूएंसर कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरचा नुकताच शाही पद्धतीने विवाह सोहळा संपन्न झाला. सोशल मीडियावर तिच्या मेहंदी, संगीत आणि हळद समारंभाचे फोटो तुफान व्हायरल झाले होते. यानंतर आता तिच्या लग्नाच्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अंकिताने तिचा बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत कोकणातील अत्यंत प्रसिद्ध लक्ष्मीनारायण मंदिरात लग्नगाठ बांधली. अंकिताने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. (Ankita Prabhu Walawalkar Wedding Photos Goes Viral )
कोकण हार्टेड गर्ल अडकली विवाहबंधनात
कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने आपल्या लग्नाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘वालावलकरांचो थोरलो जावई’.
View this post on Instagram
अंकिता तिच्या कुटुंबातील मोठी मुलगी असून तिच्या मागे धाकट्या 2 बहिणी आहेत. त्यामुळे कुणालची ओळख करून देताना तिने ‘थोरलो जावई’ अशी करून दिली आहे. यासोबत तिने आणखी एका पोस्टमध्ये लिहिलंय, ‘मी त्याची पत्नी झालेय, याकरता माझा नवरा कुणाल भगतचे खूप अभिनंदन… तो धन्य झालाय’.
अंकिता-कुणालचा शाही विवाहसोहळा
अंकिता वालावलकर मूळ कोकणची चेडवा असल्यामुळे तिने लग्नासाठी कोकणातील निसर्गाची निवड केली. कोकणातील पारंपरिक पद्धतीने आणि मुख्य म्हणजे एकदम जल्लोषात अन थाटामाटात त्यांचा लग्न सोहळा पार पडला. यावेळी अंकिता आणि कुणालने आपल्या आयुष्यातील सर्वांत सुंदर क्षणासाठी खास लूक केले होते.
View this post on Instagram
अंकिताने पिवळी जरदोसी नक्षी असलेली सुंदर साडी परिधान केली होती. हातात हिरवा चुडा, मुंडावळ्या, गळ्यात डिझायनर नेकपीस अशा सुंदर लूकमध्ये नवरी अगदी उठून दिसत होती. तर, नवरोबा कुणालचा मराठमोळा पेहराव नवरीच्या लुकला अगदी पूर्ण करून होता.
कुठे झालं लग्न?
अंकिता वालावलकर मुळची तळ कोकणातली. त्यामुळे तिने आपल्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात कोकणातील निसर्ग रम्य वातावरणाच्या साथीने करायचे ठरवले. कुणालचीदेखील साथ मिळाली आणि दोघांनी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वालावलमध्ये असणाऱ्या ‘लक्ष्मीनारायण मंदिरा’त लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला अगदी जवळचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक उपस्थित होते. अगदी दणक्यात असा हा विवाह सोहळा पार पडला आणि अखेर कोकणची चेडवा लग्नबंधनात अडकली.
हेही पहा –