घरमनोरंजनआपल्या घरीही आई, बहिणी आहेत...चंदीगड व्हिडीओ कांड प्रकरणात अंकिताची पोस्ट चर्चेत

आपल्या घरीही आई, बहिणी आहेत…चंदीगड व्हिडीओ कांड प्रकरणात अंकिताची पोस्ट चर्चेत

Subscribe

या प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडेने याप्रकरणाबाबत आपली एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आवाहन केले आहे.

चंदीगड युनिव्हर्सिटीतील एका विद्यार्थिनीने मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवल्याचा खुलासा झाल्यानंतर रविवारी दिवसभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी संबंधिक आरोपी विद्यार्थीनी आणि तिच्या प्रियकराला शिमलातून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडेने याप्रकरणाबाबत आपली एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आवाहन केले आहे.

- Advertisement -

अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत चंदिगड युनिव्हर्सिटीतील धक्कादायक प्रकारावर आपला राग व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिलंय की, “माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की ज्या कोणाला 60 मुलींचा अंघोळ करतानाचा व्हायरल होणारा खासगी व्हिडीओ मिळाला असेल त्याने तो तातडीने डिलीट करा. हे माझे विनंतीपूर्वक आवाहन आहे. आपल्या घरीही आई, बहिणी आहेत. कृपया हा व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवा आणि त्यांचा आदर करा.” असं आवहन अंकिताने तिच्या चाहत्यांना केले आहे. अंकिता लोखंडे पूर्वी अभिनेता सोनू सूदने देखील सोशल मीडियावरून या प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली होती.

काही विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न?
या घटनेमुळे वसतिगृहातील काही विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती. मात्र युनिव्हर्सिटी प्रशासन आणि पलिसांकडून ही माहिती खोटी असल्याचे सांगण्यात आले, त्याचवेळी एका बेशुद्ध अवस्थेतील मुलीला अॅम्ब्युलन्समधून नेतानाचा व्हिडीओ इंटरनेटवर खूप व्हायरल झाला होता. दुसरीकडे विद्यापीठ व्यवस्थापन कॅम्पसमधील विद्यार्थ्यांवर या प्रकरणी कोणतेही वक्तव्य न करण्यास दबाव टाकत असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युनिव्हर्सिटी प्रशासनाने वसतिगृहाच्या दोन वॉर्डनना निलंबित केले आहे. तर युर्निव्हर्सिटी सहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. मुलींच्या कपड्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ले कार्बोइसर हॉस्टेलच्या वॉर्डन राजविंदर कौरला युनिव्हर्सिटी प्रशासनाने निलंबित केले आहे.


हेही वाचा :

ही वेळ आपल्या बहिणींना साथ…चंदीगड युनिव्हर्सिटी व्हिडीओ प्रकरणाबाबत सोनू सूदची पोस्ट चर्चेत

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -