Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अंकुश चौधरीची पत्नी दीपाची छोट्या पडद्यावर पुन्हा एंट्री

अंकुश चौधरीची पत्नी दीपाची छोट्या पडद्यावर पुन्हा एंट्री

Related Story

- Advertisement -

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट हिरो अभिनेता अंकुश चौधरी आत्तापर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमधून चमकला. अंकुशप्रमाणे त्याची पत्नी दीपा परब चौधरीही मराठी चित्रपट सृष्टीत आपले स्थान पक्के करुन आहे. दीपाने आत्तापर्यंत मराठीतील अनेक मालिका, चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका निभावल्या. अनेक काळ दीपा सिनेसृष्टीपासून दूर होती. परंतू बऱ्याच काळानंतर दीपा छोट्या पडद्यावर एंट्री घेत आहे. यापूर्वी दीपा ‘अंड्या चा फंडा’ या चित्रपटात झळकली होती. त्यामुळे अभिनेत्री दीपा परब चौधरी एका नव्या हिंदी मालिकेतून पून्हा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. याबद्दस तिने इंस्टाग्रामवर नव्या मालिकेतील एक फोटो चाहत्यांना शेअर केला आहे. शौर्य और अनोखी की कहानी असे या मालिकेचे शीर्षक आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. त्यामुळे अधिक काळानंतर दीपाचा अभिनय पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

दीपाने केदार शिंदेंच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुशसोबत काम केले होते. दीपाने अनेक जाहिराती, मालिकांमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याचप्रमाणे प्रसाद ओक आणि सुबोध भावे यांच्यासह ती क्षण या चित्रपटातही झळकली. थोडी ख़ुशी थोडा गम’, ‘छोटी मॉ’, ‘मित’ आणि ‘रेत’ यासारख्या हिंदी मालिकांमध्येही तिने आपली अभिनय कला आजमावली. २००७ मध्ये दीपाने अंकुशसोबत लग्न गाठ बांधली. गेली १४ वर्ष त्यांचा सुखी संसार सुरु आहे. त्यांना प्रिन्स नावाचा एक मुलगाही आहे. लग्नानंतर कौटुंबिक आयुष्यात बिझी असल्याने दीपा अगदी कमी चित्रपटांमध्ये झळकली.


हेही वाचा- ‘डीजीफ्लिक्स’ ओटीटीवर ‘गीशा’ चा अनोखा प्रवास

- Advertisement -