मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय सुपरस्टार अंकुश चौधरी नेहमीच आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. वेगवेगळ्या भूमिकांमधून तो चाहत्यांना नव्यानं भुरळ घालतो. आता तो लवकरच एका थरारक आणि दमदार भूमिकेत झळकणार आहे. ‘पी.एस.आय. अर्जुन’ या आगामी चित्रपटातून तो प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार असून, या सिनेमाची उत्सुकता आधीच शिगेला पोहोचली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप उमटवणारा, सुपरस्टार अंकुश चौधरी लवकरच एका नव्या दमदार भूमिकेत झळकणार आहे. ‘पी.एस.आय. अर्जुन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून 9 मे 2025 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थांब म्हटलं की थांबायचं अशी चित्रपटाची टॅगलाईन असल्यामुळे यंदाच्या मे महिन्यात तापमान अधिकच गरम होणार आहे. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित विक्रम शंकर प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण पटेल आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत.
मोशन पोस्टरमध्ये अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतला पी एस आय चा लूक पाहायला मिळत आहे, जो चित्रपटाच्या कथानकाविषयी अधिकच उत्सुकता निर्माण करणारा आहे.
हेही वाचा : Tula Japnar Aahe Serial : अथर्व करेल का वेदासाठी पुन्हा लग्न ?
Edited By : Prachi Manjrekar