‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या नव्या रिलीज डेटची घोषणा

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’च्या नव्या रिलीज डेटची प्रेक्षक अनेक दिवसांपासून वाट बघत होते. यापूर्वी ८ जुलै रोजी या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली होती. मात्र काही कारणांमुळे ही रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. येत्या २९ जुलै रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

अभिनेता जॉन अब्राहमने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या रिलीज डेटबाबत माहिती शेअर केली आहे. त्यामध्ये खाली कॅप्शनमध्ये २९ जुलै रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.

हे कलाकार असतील या चित्रपटात
‘एक व्हिलन रिटर्न्स’ चित्रपटामध्ये जॉन अब्राहिमसोबत अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सने केली आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी यांनी केले आहे.

प्रेक्षकांचा मिळाला होता उदंड प्रतिसाद
या चित्रपटाचा पहिला भाग ‘एक व्हिलन’ २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्याचे दिग्दर्शन मोहित सुरीने यांनी केले होते. या चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत होते, तर रितेश देशमुखने या चित्रपटामध्ये खलनायकांची भूमिका साकारली होती. त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, शिवाय या चित्रपटातील गाणी सुद्धा चांगलीच हिट झाली होती. या चित्रपटाने जवळपास १०० करोड पेक्षा जास्त कमाई केली होती.

 


हेही वाचा :विनोदाने सजलेला ‘भिरकीट’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला