Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ला आणखी एक झटका; 14 वर्षानंतर 'या' व्यक्तीने सोडली मालिका

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला आणखी एक झटका; 14 वर्षानंतर ‘या’ व्यक्तीने सोडली मालिका

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मागील 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाशी प्रेक्षकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी आत्तापर्यंत भरभरुन प्रेम केले आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून मालिकेतील अनेक कलाकार मालिका सोडू लागले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, या मालिकेशीसंबंधीत आणखी एक व्यक्तीने मालिका सोडली आहे. यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील या व्यक्तीने सोडली मालिका
मिळालेल्या माहितीनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदाने ही मालिका सोडली आहे. मागील 14 वर्षांपासून ते या मालिकेचे दिग्दर्शन करत होते. 15 डिसेंबरपर्यंत त्यांनी मालितकेचे दिग्दर्शन केले. मिळालेल्या माहितीनुसार, मालव राजदा आणि प्रोडक्शन हाऊसमध्ये काही मतभेद होते. त्यामुळेच त्याने ही मालिका सोडली आहे. मात्र, जेव्हा याबाबत मालव यांना प्रश्न विचारण्यात आला त्याने ही माहिती फेटाळली.

- Advertisement -

मालव राजदा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, “तुम्ही जर चांगलं काम करता तर टीममध्ये याचं प्रकारची क्रिएटिव्ह विविधता असं सामान्य गोष्ट आहे. परंतु हे नेहमी कार्यक्रम चांगला टिकावा यासाठी केला जातो.” तसेच त्यांनी यावेळी प्रोडक्शन हाऊससोबत झालेल्या वादावर नकार दिला.

आत्तापर्यंत या कलाकारांनी सोडली मालिका
मालव राजदा यांच्या आधी या मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिका सोडली आहे. आत्तापर्यंत राज अनादकट, शैलेश लोढा आणि दिशा वकानी यांनी मालिकेला रामराम केला आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

चित्राजी, संजय आठवतोय का? उर्फी थेट वाघांना भिडली

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -