Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कपूर परिवारावर आणखी एक संकट, जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण

कपूर परिवारावर आणखी एक संकट, जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण

७० आणि ८० च्या दक्षकात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Related Story

- Advertisement -

सध्या संपूर्ण देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. दुसरी लाटही झपाट्याने पसरत चालली आहे. संपूर्ण जगाप्रमाणे बॉलिवूडलाही कोरोनाचा सासूर्वास भोगावा लागत आहे. या विषाणूच्या संसर्गाने कलाविश्वालाही विळख्यात घेतले आहे. ७० आणि ८० च्या दक्षकात आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांना मुंबईच्या कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर त्यांच्या तब्येतीबद्दल अनेक तर्कवितर्क सुरु झालेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randhir Kapoor (@dabookapoor)

बुधवारी सकाळी रणधीर कपूर यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यानंतर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सोबतच त्यांना मधूमेह ही असल्याचे म्हटले जात आहे. रणधीर यांना सध्या व्ही. आय. पी. रुममध्ये दाखल केले असून डॉक्टरांची संपूर्ण टीम त्यांची काळजी घेत आहे. रणधीरच्या आधी नीतू कपूर आणि रणवीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान दोघांनीही यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे.


- Advertisement -

हे वाचा-   Corona: सोनू सूदच्या मदतीचा ओघ सुरुच; आता इंजेक्शनची करतोय मदत

- Advertisement -