Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन जा, तुला माफ केलं.... सतीश कौशिक यांच्यासाठी अनुपम खेर यांची आणखी एक...

जा, तुला माफ केलं…. सतीश कौशिक यांच्यासाठी अनुपम खेर यांची आणखी एक भावनिक पोस्ट

Subscribe

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे 9 मार्च 2023 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सतीश यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला. त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक मित्र-परिवार आणि चाहते आता हळूहळू या दुःखातून सावरत आहेत. मात्र, सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र अनुपम खेर हे अजून दुःखात आहेत. सतीश कौशिक यांच्या निधनावर अनुपम खेर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा आपली व्यथा मांडली आहे. शिवाय सतीश यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी कोलकाता येथील कालीघाट मंदिराला भेट दिली होती.

दरम्यान, सोमवारी मुंबईत सतीश कौशिक यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूडमधील सर्व कलाकारांसोबत अनुपम खेर यांनीही श्रद्धांजली वाहिली. त्याचवेळीचा एक व्हिडिओ आता अनुपम यांनी शेअर करताना भावनिक शब्दांत कॅप्शन लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

- Advertisement -

अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांना त्यांच्या फोटोसमोर पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “जा!!! तुला माफ केलं! मला एकटं सोडून जाण्यासाठी !! लोकांच्या हसण्यात मी तुला नक्कीच पाहिन, पण रोज आपल्या मैत्रीची सल मनात असणार! अलविदा माझ्या मित्रा! या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये तुझं आवडतं गाणं लावलं आहे..! ओम शांती.” अशी भावनिक पोस्ट अनुपम खेर यांनी केली आहे.

 


- Advertisement -

हेही वाचा :

मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये साजरा केला जातोय गुढीपाडवा!

- Advertisment -