Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी विरुष्काच्या बेबी Vamikaची आणखी एक झलक समोर, डीव्हिलियर्सच्या मुलीसोबत वामिकाचा फोटो व्हायरल

विरुष्काच्या बेबी Vamikaची आणखी एक झलक समोर, डीव्हिलियर्सच्या मुलीसोबत वामिकाचा फोटो व्हायरल

इंग्लंड दौऱ्यावर निघतानाही पापाराझींनी विरुष्का आणि वामिकाला आपल्या कॅमेरात कैद केले होते.

Related Story

- Advertisement -

सगळ्यांचे लाडके कपल म्हणजेच विराट (Virat Kohli) आणि अनुष्का (Anushka Sharma) दोघांनाही जानेवारी महिन्यात कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्याच्या छोट्या वामिकाला (Vamika) पाहण्यासाठी चाहते भलतेच उत्साही असल्याचे वारंवर दिसून आले आहे. पुन्हा एकदा वामिकाची एक झलक सोशल मीडियावर समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या सिझनसाठी टिम इंग्लंड दौऱ्यावर गेली आहेत. इंडिया क्रिकेट टिमचा कॅप्टन विराट कोहली सोबत अनुष्का आणि मुलगी वामिकाही रवाना झाले. नुकताच एबी डीव्हिलियर्सच्या (ab de Villiers) मुली सोबत वामिकाचा एक फोटो व्हायरल होत आहे. एबी डिव्हिलियर्सची पत्नी डॅनियलने (danielle de Villiers)  तिच्या मुलीचा आणि वामिकाचा क्युट फोटो शेअर करत ‘बेबी तिच्या पहिल्या मौत्रिणीला मिठी मारतेय’,असे कॅप्शन दिले आहे. ( another glimpse of Virushka baby Vamika, Vamika’s photo with ab de Villiers daughter goes viral)


डॅनियलने शेअर केलेल्या मुलींच्या या क्युट फोटोवर अनुष्काने देखील हार्ट इमोजी टाकून रिअँक्शन दिली आहे. त्याचप्रमाणे फोटोच्या खाली लगेच वामिका आणि येन्टी असे म्हणत अनेकांनी दोघींसाठी प्रेम व्यक्त केले आहे. या फोटोवरुन डाव्या बाजूला असलेली वामिका असल्याचे अंदाज फॅन्सनी लावला आहे. फोटोमध्ये वामिका आणि येन्टी दोघींनीही बेबी पिंक रंगाचा सेम फ्रॉक घातला आहे. डॅनियलने काही दिवसांपूर्वीही इंन्टा स्टोरीमध्ये तिचा आणि अनुष्काचा फोटो शेअर केला होता. ज्यात दोघींच्या हातात मुली आहेत. दोघींनीही मास्क आणि फेस शिल्ड लावले होते. हा फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

- Advertisement -

इंग्लंड दौऱ्यावर निघतानाही पापाराझींनी विरुष्का आणि वामिकाला आपल्या कॅमेरात कैद केले होते. त्यावेळी वामिकाची हलकीशी झलक समोर आली होती. विरुष्का ने आपली मुलगी मोठी होत नाही तिला सोशल मीडिया म्हणजे काय हे कळत नाही तोवर तिचे कोणतेही फोटो सोशल मीडियावर शेअर करणार नसल्याचे सांगितले आहे. एकंदरीतच वामिकाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय आईबाबा विरुष्काने घेतला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – JuhiChawla5GCase: 20 लाखांच्या भुर्दंडानंतर जुहीने शेअर केला व्हिडिओ

- Advertisement -