घरमनोरंजनहनुमान जयंतीच्या निमित्ताने 'आदिपुरुष'चे आणखी एक नवे पोस्टर

हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘आदिपुरुष’चे आणखी एक नवे पोस्टर

Subscribe

साऊथ अभिनेता प्रभासचा आदिपुरुष चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. 30 मार्च रोजी रामनवमीच्या निमित्ताने या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या पोस्टरवरुन सध्या अनेक वाद निर्माण झाले आहेत. दरम्यान, अशातच आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने या चित्रपटातील श्री हनुमानाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.

मराठमोळ्या अभिनेत्याने साकारली हनुमानाची भूमिका

आदिपुरुषच्या या पोस्टरमध्ये मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमान म्हणून दिसत आहे. अभिनेता प्रभासने देखील हनुमानाचे हे नवीन पोस्टर शेअर केले आहे. या फोटोमध्ये श्री हनुमान रामाच्या ध्यानात मग्न झाले आहेत यात रामाप्रती त्यांचे शौर्य आणि क्रूरता दिसत आहेत. या फोटोखाली प्रभासने लिहिलंय की, “राम के भक्त और रामकथा के प्राण…जय पवनपुत्र हनुमान!”

दिग्दर्शकांवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

- Advertisement -

या चित्रपटाचे दिग्दर्शनक ओम राऊत यांच्यावर एका व्यक्तीकडून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. 30 मार्च रोजी शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये ‘रामचरितमानस’या हिंदू धर्मग्रंथातील पात्रे अयोग्य पद्धतीने दाखवण्यात आली असून या पोस्टरमध्ये भगवान श्रीराम ज्या ड्रेसमध्ये दाखवले आहेत ते रामचरितमानसपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. यासोबतच श्रीरामांनी जनेयू देखील यात परिधान केलेला दिसत नाही. तसेच या पोस्टरमधील सीतेच्या भांगात कुंकू देखील दिसत नसल्याचं सांगितलं.

या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

प्रभास आणि कृति सेनन यांचा ‘आदिपुरुष’ चित्रपट 16 जून 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसेल तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसेल. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली-2’ सारख्या चित्रपटानंतर प्रभासला या अवतारात पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘आदिपुरुष’चा वाद पुन्हा चिघळला; दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -