Ganeshostav 2021 :सलमान ,आयुष आणि वरुण धवन थिरकले ‘विघ्नहर्ता’च्या तालावर!

विघ्नहर्ता'च्या टीजरने दर्शक आणि चाहत्यांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता, संपूर्ण ट्रॅक रिलीज झाला आहे

antim movie vighnharta song releases
Ganeshostav 2021 :सलमान ,आयुष आणि वरुण धवन थिरकले 'विघ्नहर्ता'च्या तालावर!

बॉलिवूडचा(bollywood) भाईजान सलमान खानचा(salmaan khan)’अंतिम द फाइनल ट्रुथ'(antim) सिनेमाची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. नुकतच मेकर्सने सिनेमाच पहिलं-वहिलं ‘विघ्नहर्ता’ हे गाण प्रदर्शित केलं (antim movie vighnharta song releases) असून या गाण्यात सलमानचा जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर (social media) हे गाण व्हायरल होत आहे. ‘विघ्नहर्ता’च्या टीजरने दर्शक आणि चाहत्यांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता, संपूर्ण ट्रॅक रिलीज झाला आहे आणि याला मिळणारा दर्शक आणि चाहत्यांचा प्रतिसाद जबरदस्त आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ची हाय-ऑन एनर्जी फेस्टिव डांस ट्रॅकमध्ये सलमान खान, आयुष शर्मा आणि वरुण धवन झळकत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

टीजर प्रदर्शित केल्यानंतर, याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून कलाकारांच्या चाहत्यांकडून याचे भव्य स्वागत होत आहे. या ट्रॅकमध्ये वरुण आणि आयुष यांच्या ऊर्जावान डांस स्टेप्स पाहायला मिळत आहेत.अल्वपधीच चाहत्यांना हे गाण पसंतीच पडले असून आत्तापर्यत्न लाखो लोकांनी हे गाण यूट्यूबवर पाहिलं आहे.ही पहिलीच वेळ आहे जेव्हा, सलमान खान आणि आयुष शर्मा एकमेकांसोबत स्क्रीन शेयर करताना दिसणार आहेत. यामुळे प्रेक्षकांना हा सिनेमा कधी रिलीज होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.सलमान खान फिल्म्स द्वारा प्रस्तुत, ‘अंतिम’ सलमान खान द्वारा निर्मित आणि महेश मांजरेकर यांच्याद्वारे दिग्दर्शित आहे. तसेच ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक असून चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेता सलमान खानच्या भूमिके विषयी सांगायचे झाल्यास सलमान खान एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून आयुष गँगस्टरची भूमिका साकारणार आहे. तसेच या सिनेमातून अभिनेत्री महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 


हे हि वाचा – Ganeshostav 2021 : ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेत बप्पाचं जल्लोषात आगमन