Antim Release: ‘अंतिम’ पाहणाऱ्या चाहत्यांनी सिनेमागृहात फोडले फटाके अन् सलमान खान VIDEO शेअर करत म्हणाला…

Antim Release: Fans watching 'Final' burst into firecrackers in cinemas and Salman Khan sharing VIDEO said ...
Antim Release: 'अंतिम' पाहणाऱ्या चाहत्यांनी सिनेमागृहात फोडले फटाके अन् सलमान खान VIDEO शेअर करत म्हणाला...

अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘अंतिम’ चित्रपट पाहताना काही चाहते सिनेमागृहात फटाके फोडत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.सलमान खानचा ‘अंतिम’ हा चित्रपट शुक्रवारी मालेगावच्या सुभाष चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. रात्रीच्या शेवटच्या शो दरम्यान, सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या सलमानच्या काही चाहत्यांनी सिनेमागृहात फटाके फोडण्यास सुरुवात केली, ज्यामुळे सिनेमागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.  याप्रकरणी  पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आतापर्यंत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.हा व्हिडीओ सलमान खानने इंस्टाग्रामवर शेअर करत त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानने सर्व प्रेक्षकांना सिनेमागृहात फटाके  नेऊ नयेत किंवा फोडू नयेत अशी विनंती केली आहे. कारण ते प्राणघातक ठरू शकते. त्यांनी सिनेमागृहांशी संबंधित लोकांनाही याबाबत आवाहन केले आहे की, त्यांनी प्रेक्षकांना आतमध्ये फटाके घेऊन जाऊ देऊ नयेत आणि आत पाठवण्यापूर्वी त्यांची नीट तपासणी करावी.

सलमान खान या चित्रपटात एका डॅशिंग, पोलिसाची भूमिका साकारत आहे जो गुन्हा रोकण्यासाठी काहीही करू शकतो. सलमान कमालीचा उत्साही आणि दृढनिश्चयी दिसत असून सरदारच्या पोशाखात आहे. ट्रेलरमध्ये आयुषच्या व्यक्तिरेखेतील परिवर्तन प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. चित्रपटातील एका निष्पाप तरुण मुलापासून ते सर्वात आक्रमक, भयंकर आणि प्रादेशिक गुंडांपैकी एक असा आयुषचा प्रवास अविश्वसनीय आहे जो चित्रपटात पाहायला मिळतं आहे.  सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना मुख्य भूमिकेत असलेल्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. हा चित्रपट सलमान खान द्वारे निर्मित आणि सलमान खान फिल्म्स द्वारे प्रस्तुत करण्यात आला आहे.


हे ही वाचा – omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नाही – ICMR