अनुपम खेर यांनी केली त्यांच्या ५२६ व्या चित्रपटाची घोषणा

एका मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले होते की, "वय हा केवळ आकडा आहे. अजून मला २०-२५ वर्ष काम करायचं आहे. मी अजूनही निवृत्त होण्याचा अजिबात विचार करत नाही."

बॉलिवूडचे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर कधी त्यांच्या चित्रपटांमुळे तर कधी त्यांच्या सामाजिक विषयावरील प्रतिक्रियांमुळे चर्चेत असतात.  सध्या ते त्यांच्या ‘कागज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. खरंतर अनुपम खेर यांचा हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील ५२६ वा चित्रपट असणार आहे. ‘कागज’ चित्रपटाबाबत सांगताना त्यांनी ही माहिती शेअर केली. सध्या अनुपम खेर यांचं वय ६७ इतकं आहे, मात्र तरी सुद्धा ते अनेक चित्रपटांमध्ये उत्तम भूमिका साकारताना दिसत असतात. तसेच सध्या ते त्यांच्या फिजिकल ट्रांसफॉर्मेशनमुळे चर्चेत आहेत.

अनुपम खेर करणार अजून २०-२५ वर्ष काम
एका मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले होते की, “वय हा केवळ आकडा आहे. अजून मला २०-२५ वर्ष काम करायचं आहे. मी अजूनही निवृत्त होण्याचा अजिबात विचार करत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर यांनी सांगितले की, आत्तापर्यंत त्यांनी चित्रपटांमध्ये २८ ते ६५ वर्षाच्या व्यक्तिंची भूमिका साकारत आपल्या करिअरला सुरूवात केली होती.

या चित्रपटांमध्ये दिसणार अनुपम खेर
अनुपम खेर आता ‘ऊंचाई’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करत आहेत. या चित्रपटात अभिनेता अमिताभ बच्चन,बोमन ईरानी आणि नीना गुप्‍ता हे मुख्य भूमिकेत दिसून येतील. या चित्रपटाव्यतिरिक्त अनुपम खेर ‘सिग्नेचर’ चित्रपटात दिसणार आहेत.

 


हेही वाचा :अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटातील लूक झाला लीक; लंडनमध्ये सुरू आहे शूटिंग