Monday, June 21, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन अनुपम खेर यांचे Koo ॲपवर १ मिलियन फॉलोअर्स

अनुपम खेर यांचे Koo ॲपवर १ मिलियन फॉलोअर्स

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर आपल्या चित्रपटांसाठी तसेच वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं व्यक्त करण्यासाठी ओळखलं जातात. अनुपम खेर सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असतात आणि त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात असतात. असं कोणतंही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नसेल ज्यावर अनुपम खेर सक्रिय नसतील. ट्विटर, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया अॅप्लिकेशननंतर आता अनुपम खेर कु अ‍ॅपवरही अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. विशेष म्हणजे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे १ मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत.

नुकतेच अनुपम खेर यांचे कूवर १० लाखाहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत, यासाठी अनुपम खेर यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी कूवर एक पोस्च शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी असे म्हटले की, “मी १०० दिवसांत १ मिलियन फॉलोअर्स पर्यंत पोहोचलो आहे, हे केवळ माझ्यासाठीच नाही तर या आत्मानिर्भर अ‍ॅप कुसाठीही भारतीय लोकांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. मी या अ‍ॅपच्या मागे असलेल्या टीमचे अभिनंदन करू इच्छितो, विशेषत: अप्रमेय आणि मयंक ज्यांनी मायक्रो-ब्लॉगिंगची ओळख करुन भारताला गौरवान्वित केले आहे आणि मी कू अॅपवर बर्‍याच संवादांची अपेक्षा करतो.”

- Advertisement -

यासह अनुपम खेर ट्विटरवरही खूप अ‍ॅक्टिव्ह असून सर्व विषयांवर ते मोकळेपणाने आपले मतं मांडत असतात. आता अनुपम खेर यांनी एका कवितेतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल कू वर काही ओळी लिहिल्या आहेत आणि त्या चाहत्यांसह शेअर केल्या आहेत. “बस इतनी सी बात पर हमारा परिचय तमाम होता है, हम उस रस्ते नहीं जाते जो रास्ता आम होता है.”


- Advertisement -