Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार न मिळाल्याने अनुपम खेर नाराज

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार न मिळाल्याने अनुपम खेर नाराज

Subscribe

चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला असून 69 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये अनेक कलाकारांना पुरस्कार मिळाले आहेत. अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर आलिया अभिनेत्री कृती सेननला देखील मिमीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच अभिनेता अल्लू अर्जुनला ‘पुष्पा: द राइज’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान, अशातच अभिनेते अनुपम खेर यांनी एक पोस्ट शेअर करत ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार न मिळाल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

अनुपम खेर यांची पोस्ट चर्चेत

अनुपम खेर यांनी नुकतीच एक पोस्ट आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाने प्रतिष्ठेचा सर्वात महत्त्वाचा पुरस्कार जिंकला आहे. ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार. केवळ एक अभिनेता म्हणूनच नाही तर चित्रपटाचा कार्यकारी निर्माता म्हणूनही या चित्रपटाला मिळालेल्या मानाने मी आनंदी आहे. पण मला माझ्या अभिनयासाठी पुरस्कार मिळाला असता तर अधिक आनंद झाला असता. पण सर्व इच्छा पूर्ण झाल्यावर पुढे काम करण्याची मजा आणि उत्साह कसा राहील. जाऊ दे! पुढच्या वेळेस!” असं अनुपम खेर यांनी लिहिलं आहे. अल्लू अर्जुनला पुरस्कार मिळाल्याने अनुपम खेर नाराज असल्याचं या पोस्टवरुन लक्षात येत आह

पल्लवी जोशीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार

- Advertisement -

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला. तसेच अभिनेत्री पल्लवी जोशीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता.

 


हेही वाचा : ‘गंगूबाई काठियावाड़ी’ साठी आलियाने पटकावला राष्ट्रीय पुरस्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -