Anupam Kher Meet Modi : अनुपम खेर यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; आईची ‘ही’ खास वस्तू दिली भेट

anupam kher meets pm narendra modi gifted him rudraksha mala from his mom dulari
Anupam Kher Meet Modi : अनुपम खेर यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; आईला दिली खास भेट

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची द कश्मीर फाईल्स चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयामुळे विशेष चर्चा आहे. नुकतीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी अनुपम खेर यांनी त्यांची आई दुलारी खेर यांच्यावतीने दिलेली एक खास वस्तू मोदींनी भेट म्हणून दिली आहे. अनुपम खेर यांनी पंतप्रधान मोदींच्या या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी मोदींच्या कार्याचा उल्लेख करत कौतुक केले आहे.

पहिल्या फोटोमध्ये पंतप्रधान आणि अनुपम खेर कॅमेरासमोर उभे असल्याचे दिसतेय. तर दुसऱ्या फोटोमध्ये अनुपम खेर पंतप्रधान मोदींच्या हातात एक भेटवस्तू देताना दिसतं आहे. ही भेटवस्तू म्हणजे खेर यांच्या आईने दिलेली रुद्राक्षांची माळ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आज तुम्हाला भेटून मन आणि आत्मा दोन्ही प्रसन्न झाले. देशासाठी तुम्ही करत असलेल्या परिश्रमाबद्दल तुमचे आभार मानण्याची संधी मिळाली आणि तुमच्या रक्षणासाठी तुम्ही माझ्या आईने पाठवलेली रुद्राक्षाची माळ ज्या श्रद्धेने स्वीकारली, ते दुलारीजी आणि मी सदैव लक्षात ठेवू. परमेश्वराचे आशीर्वाद सदैव राहो आणि आम्हाला सर्वांना तुमची अशीच ऊर्जा देत राहा, जय हिंद!’

अनुपम खेर यांच्या मोदींनीही ट्विट करत उत्तर दिलेय, अनुपम खेरजी तुमचे खूप खूप आभार, आदरणीय माताजींचा आणि देशवासियांचा आशीर्वादच मला भारत मातेच्या सेवेसाठी सतत प्रेरित करत आहेत असं त्यांनी लिहिलं आहे.


sidharth malhotra आणि kiara advani चं ब्रेकअप! दोघांच्या इन्स्टा पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा