‘इमरजेंसी’चं टीझर पाहून अनुपम खेर यांनी केलं कंगनाचं कौतुक

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या आगामी ‘इमरजेंसी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात कंगनाने माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. नुकतंच या चित्रपटातील कंगनाचा पहिला लूक रिवील करण्यात आला. सोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचे टीझर सुद्धा रिलीज केले, ज्यात कंगना अगदी हूबेहुब इंदिरा गांधी यांच्या प्रमाणे हावभाव, बोलण्याची शैली साकारताना दिसत आहे. हा टीझर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर कंगनाच्या अभिनयाचं युजर्सकडून कौतुक केले जात आहे. शिवाय आता बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया देत कंगनाचं कौतुक केलं आहे.

‘इमरजेंसी’च्या टीझर पाहून अनुपम खेर झाले खूश

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

अनुपम खेर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘इमरजेंसी’चं टीझर शेअर करत लिहिलं की, प्रिय कंगना, इमरजेंसी चित्रपटाचं टीझर काय कमाल आहे! तुम्ही खरोखरंच असाधारण आणि प्रतिभाशाली आहात! माझे आजोबा म्हणायचे, “वाहत्या समुद्राला कोणीही अडवू शकत नाही!” जय हो!

इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना रनौत
‘इमरजेंसी’च्या टीझरमध्ये कंगनाने साकारलेली इंदिरा गांधी यांची भूमिकेमुळे कंगनाचे खूप कौतुक केले जात आहे. कंगना अगदी हूबेहुब इंदिरा गांधी यांच्या प्रमाणे हावभाव, बोलण्याची शैली साकारताना दिसत आहे. तिच्या या अभिनयाचं कौतुक अनेकांकडून कौतुक केलं जात आहे.

या दिवशी रिलीज होणार ‘इमरजेंसी’
या चित्रपटातील गोष्ट १९७५ मध्ये आलेल्या आपतकालीन संकटावर आधारित असणार आहे. कंगनाचा हा चित्रपट २५ जून २०२३ रोजी चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे.


हेही वाचा :‘द कपिल शर्मा शो’च्या नव्या सीजनला ‘या’ दिवशी होणार सुरुवात; शोमध्ये नव्या कलाकारांची होणार एन्ट्री