घरमनोरंजनएसएस राजामौलींच्या घरी पोहोचले अनुपम खेर; राजामौली यांचा शाल देऊन सत्कार

एसएस राजामौलींच्या घरी पोहोचले अनुपम खेर; राजामौली यांचा शाल देऊन सत्कार

Subscribe

अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करत एसएस राजामौली यांच्यालाठी एक स्पेशल मॅसेज देखील लिहिलेला आहे

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी नुकतीच चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांची भेट घेतली. एसएस राजामौली यांनी अनुपम खेर यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. यादरम्यान, अनुपम खेर यांनी हे फोटो सोशल मीडिया शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राजामौलींसोबत त्यांची पत्नी रमा राजामौली देखील दिसत आहे.

अनुपम खेर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करत एसएस राजामौली यांच्यालाठी एक स्पेशल मॅसेज देखील लिहिलेला आहे. अनुपम खेर यांनी लिहिलंय की, प्रिय रमा जी आणि राजामौली हैदराबादमध्ये तुमच्या घरामध्ये उत्तम जेवण आणि प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद! मला तुमच्याच घरामध्ये तुमचं पारंपारिक पद्धतीने शॉल देऊन स्वागत करून खूप छान वाटलं. मला तुमची विनम्रता आणि साधेपणा खूप आवडला. मी नशीबवान आहे. तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

- Advertisement -

तसेच, या व्हिडीओमध्ये अनुपम खेर राजमौली यांच शाल देऊन आदर करताना दिसत आहेत. अनुपम खेर यांचा आदर पाहून राजामौली आणि त्यांची पत्नी आश्चर्यचकित होतात. यावेळी अनुपम खेर म्हणतात की, मग मला तुम्ही लक्षात कसं ठेवणार? यावर राजामौलींची पत्नी म्हणते की, तुम्हाला कोणा कसं विसरेल. त्यानंतर एका फोटोमध्ये राजामौली आणि अनुपम खेर हात जोडताना दिसत आहेत.

अनुपम खेर दिसणार या चित्रपटात
अनुपम खेर येत्या काळात कंगना रनौतच्या ‘इमरजेंसी’ चित्रपटामध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात ते जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहे. या शिवाय अनुपम खेर रवि तेजा यांच्या ‘टायगर नागेश्वर राव’ मध्ये दिसणार आहेत.


हेही वाचा :दयानंतर टप्पू सोडणार ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’?

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -