घरताज्या घडामोडीVideo: भीक मागणाऱ्या मुलीचे फर्राटेदार इंग्रजी; अनुपम खेर झाले इम्प्रेस, शिक्षणाची घेतली...

Video: भीक मागणाऱ्या मुलीचे फर्राटेदार इंग्रजी; अनुपम खेर झाले इम्प्रेस, शिक्षणाची घेतली जबाबदारी

Subscribe

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर सोशल मीडियावर खूप सक्रीय असतात. नेहमी चाहत्यांसोबत काहींना काहीतरी शेअर करत असतात. जास्तकरून आपल्या आईसोबतचे व्हिडिओ अनुपम खेर शेअर करत असतात. सध्या अभिनेते अनुपम खेर ‘ऊंचाई’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी नेपाळमध्ये आहेत. परंतु शूटिंगमध्ये व्यस्त असूनही अनुपम खेर यांनी नेपाळमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका भीक मागणाऱ्या मुलीचा आहे. जी काठमांडूमधील मंदिराबाहेरील रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांकडून भीक मागते. परंतु मुलगीकडे एक असे कौशल्य आहे, ज्यामुळे अनुपम खेर इम्प्रेस झाले आहेत आणि त्यांनी या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

जेव्हा ही मुलगी अनुपम खेर यांच्याकडे पैसे मागत होती, तेव्हा ती फर्राटेदार इंग्रजी बोलू लागली. हे पाहून अनुपम खेर यांनी तिला शाळेत जातेस का? असे विचारले. तेव्हा मुलगी म्हणाली की, ती कधीही शाळेत गेली नाही. कारण तिचे कुटुंब खूप गरीब आहे. पोट भरण्यासाठी तिला भीक मागावी लागत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

- Advertisement -

अनुपम खेर यांनी या मुलीचा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘मी काठमांडूच्या एका मंदिराबाहेर आरतीला भेटलो. ती राजस्थानची राहणारी आहे. तिने माझ्याकडे पैसे मागितली आणि फोटो काढण्यास सांगितले. त्यानंतर ती माझ्यासोबत फ्लूएंट इंग्रजीत बोलू लागली. मी तिची शिक्षणासाठी असलेली आवड पाहून हैराण झालो. हे आमच्या दोघांमधील संभाषण. अनुपम खेर फाऊंडेशन तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेईल. जय हो.’


हेही वाचा – सुष्मिता सेनच्या घरी आली नवी पाहुणी

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -