घरताज्या घडामोडीIB 71 मध्ये अनुपम खेर साकारणार खास भूमिका, शूटींगला सुरुवात

IB 71 मध्ये अनुपम खेर साकारणार खास भूमिका, शूटींगला सुरुवात

Subscribe

सिनेमात अनुपम खेर एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. द काश्मीर फाईल्सनंतर अनुपम खेर यांना पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी त्यांचे चाहते फार उत्सुक आहेत.

IB 71 : द काश्मीर फाईल्स सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यानंर अभिनेते अनुपम खेर पुन्हा नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आयबी ७१ असे या सिनेमाचे नाव आहे. एक्शन सुपरस्टार विद्युत जामवाला त्याच्या एक्शन हिरो फिल्म्सच्या अंतर्गत आपल्या पहिला होम प्रोडक्शन सिनेमा प्रेक्षकांसमोर आणत आहेत. सिनेमाच्या शूटींगलाही सुरुवात झाली असून सिनेमाच्या जम्मू काश्मीर शेड्यूल दरम्यान संपूर्ण टीमला प्रचंड प्रेम मिळाले. सिनेमात अनुपम खेर एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. द काश्मीर फाईल्सनंतर अनुपम खेर यांना पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी त्यांचे चाहते फार उत्सुक आहेत.

विद्युत जामवालाने अनुपम खेर सिनेमाचा हिस्सा असल्याची घोषणा केली. त्यांनी म्हटले, “आयबी ७१ सिनेमाच्या संपूर्ण टीमच्या वतीने मी तुमचे स्वागत करतो. तुमच्या इतका मोठा अभिनेता या विशेष सिनेमाच्या स्टार कास्टचा हिस्सा झाल्याने मला फार आनंद झालाय. सिनेमाप्रती तुमचे विचार आणि उत्साह आम्हाला प्रत्यक्षात फार प्रेरणादायी आहेत. माझ्या पहिल्या प्रोडक्शन सिनेमात तुमच्या सारखा कुशल अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी संधी मिळाली सिनेमा खरोखरच खूप छान होईल”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

- Advertisement -

तर अभिनेते अनुपम खेर यांनीही सिनेमाचा एक भाग झाल्यानंतर प्रतिक्रिया दिलीय, ते म्हणाले, ऐतिसाहासिक गोष्टी मांडणाऱ्या आयबी ७१ या सिनेमाची मी एक भाग आहे याचा मला आनंद आहे. ही एक अशी स्क्रिप्ट आहे ज्यावर भरपूर काम करण्यात आले आहे. मी किशोरवयात होता त्या काळातला हा सिनेमा आहे”. तर अनुपम खेर यांनी सिनेमाच्या शूटींगचे विद्युतसोबतचे फोटो शेअर करत त्याचे कौतुक केलेय. त्यांनी म्हटलेय, “मी माझ्या ५२३ व्या #IB71  सिनेमाची सुरुवात करतोय. अत्यंत प्रतिभावान आणि मनापासून नम्र अशा विद्युत जामवालासोबत मी सिनेमा करत आहे! त्याची कंपनी एक्शन हिरो फिल्म्स सिनेमाची निर्मिती करत आहे”.

- Advertisement -

एक्शन हिरो फिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेनमेंटद्वारे सिनेमाची निर्मिती करण्यात आलीय. तर संकल्प रेड्डी यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलेय. आदित्य शास्त्रीने सिनेमाची गोष्ट लिहिलीय तर स्क्रिन प्ले स्टोरी हाऊस फिल्स एलएलपी द्वारे करण्यात आलेय.


हेही वाचा – महेश मांजरेकर दिग्दर्शित वीर सावरकरांच्या बायोपिकची घोषणा, रणदीप हुड्डा साकारणार सावरकरांची भूमिका

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -