घरताज्या घडामोडीकरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी हात जोडा!

करोना व्हायरसपासून वाचण्यासाठी हात जोडा!

Subscribe

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचा करोना व्हायरसपासून वाचण्यासाठीचा सल्ला देणारा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. या अजब सल्ला ऐकल्यामुळे नेटकरी या व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया देत आहेत.

जगभरात करोना व्हायरसने थैमान घातलं आहे. आता भारतात देखील करोना व्हायरसची दहशत पसरली आहे. भारतात ६ जणांना करोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याचं पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी एक वेगळाचं उपाय सांगितला आहे. करोना व्हायरसापासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल त्यांनी व्हिडिओ केला आहे. अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ ट्विटवर शेअर केला आहे. सध्या याच व्हिडिओबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

या व्हिडिओमध्ये अनुपम खेर म्हणतं आहेत की, ‘माझ्या मित्रांनो, जगात करोना व्हायरस पसरत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, आपण एकमेकांना भेटल्यानंतर हस्तांदोलन करू नये. त्याऐवजी भारतीय परंपरेनुसार हात जोडून नमस्कार करावा. यामुळे करोनाचे विषाणू पसरणार नाहीत.’

- Advertisement -

अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं की, ‘करोना व्हायरसपासून वाचण्यासाठी अनेक लोक सतत हात धुण्याचा सल्ला देत आहेत. मी असं करतो. पण मला लोकांना एक सल्ला देण्याची इच्छा आहे. या व्हायरसपासून वाचण्यासाठी भारतीय परंपरेतील एक जुना पर्याय आहे. नमस्कार.’ अनुपम खेर यांच्या या व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया येत आहे.

- Advertisement -

‘वन डे’ या चित्रपटात अनुपम खेर दिसलं होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री इशा गुप्ता ही मुख्य भूमिकेत दिसली होती. त्यानंतर अनुपम खेर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमनोहन सिंग यांच्यावर आधारित असलेल्या चित्रपटात ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसले होते.


हेही वाचा – आपला मृत्यू देखील झाला ‘मेड इन चायना’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -