मित्राच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी अनुपम खेर यांनी घेतलं काली मातेचं दर्शन

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबीय, चाहते देखील दुःखी झाले आहेत. अनेकजण सतीश कौशिक यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अशातच सतीश कौशिक यांचे जवळचे मित्र ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये त्यांनी प्रिय मित्र सतीश कौशिक यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी कोलकाता येथील प्रसिद्ध कालीघाट मंदिराला भेट दिली आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अनुपम खेर यांनी कोलकातामधील कालीघाट मंदिराला दिली भेट

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

नुकत्याच काही तासांपूर्वी रविवारी अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो कोलकाता येथील कालीघाट मंदिराच्या दर्शनादरम्यानचा आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनुपम खेर यांनी लिहिलंय की, “आज कोलकात्याच्या महान कालीघाट मंदिरात देवी कालीचे दर्शन घेतल्यानंतर माझे मन तृप्त झाले. देशाच्या अखंडतेसाठी आणि तुम्हा सर्वांसाठी प्रार्थना केली. तसेच माझा प्रिय मित्र सतीश कौशिक यांच्या आत्म्याला शांती लाभो यासाठी प्रार्थना केली, देशातील मंदिरांचा इतिहास अद्भुत आहे.”

सतीशच्या यांच्या मृत्यूमुळे अनुपम खेर भावूक

अनुपम खेर यांनीच सर्वात आधी सोशल मीडियावर सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली होती. त्यानंतर अनुपम खेर यांचे अनेक व्हिडीओ समोर आले होते, ज्यामध्ये ते सतीश कौशिक यांच्या निधनामुळे रडताना आणि दु:खी होताना दिसत होते.

 


हेही वाचा :

‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटाने चौथ्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी