घरमनोरंजनकिसींग प्रॅक्टिससाठी अनुपम खेर यांची अजब 'ट्रिक'!

किसींग प्रॅक्टिससाठी अनुपम खेर यांची अजब ‘ट्रिक’!

Subscribe

अनुपम आणि अर्चनाने १९८९मध्ये लडाई या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात दोघांचा किसींग सीन होता. या किसींगसीन वेळेची एक गम्मत अर्चनाने सगळ्यांबरोबर शेअर केली.

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये अभिनेता अनुपम खेर यांनी हजेरी लावली. यावेळी अनेक जून्या आठवणींना उजाळा मिळाला कारण ‘द कपिल शर्मा शो’मध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्या जागी आता अभिनेत्री अर्चना पुरण सिंग आहे. अर्चना पुरणसिंग आणि अनुपम खेर यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे. ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटात अनुपम व अर्चनाने केलेली भुमिका प्रचंड गाजली. त्यानंतर अनेक चित्रपटात ते एकत्र दिसले. मोहबते, मिस्टर मल्होत्रा, मिस ब्रिगेंजा या चित्रपटात ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आली. आता अनेक चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर अनेक किस्से तर या दोघांकडे असणारच त्यामुळे साहजिकच ‘द कपिल शर्मा शो’ हा भाग किस्से आणि हशा ने भरलेला होता.

यावेळी अर्चनाने एक मजेशीर किस्सा सगळ्यांना सांगितल्या. अनुपम आणि अर्चनाने १९८९मध्ये लडाई या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात दोघांचा किसींग सीन होता. या किसींगसीन वेळेची एक गम्मत अर्चनाने सगळ्यांबरोबर शेअर केली. अर्चना म्हणाली, मी आणि अनुपम लडाई चित्रपटाचे शुटींग करत होतो. दिग्दर्शकांनी आमच्यात एक किसींग सीन शूट करायचा असं ठरवलं. जेव्हा मला याविषयी समजले तेव्हा मी खूप घाबरले. या आधी मी एकही किसींग सीन दिला नव्हता. त्यामुळे मी लगेचच दिग्दर्शकाला फोन केला आणि सीन करू शकणार नाही असं सांगितलं. त्यामुळे हा सीन काढून टाकण्यात आला. हा किस्सा सांगीतल्यावर अर्चना अनुपम यांना म्हणाली, मी ज्याप्रमाणे दिग्दर्शकाला कॉल केला त्याप्रमाणे तू किरणला कॉल करून परवानगी मागितलीस ना?

- Advertisement -

मात्र यावेळी अनुपम यांनी देखील ”मला पहिल्यांदाच किसिंग सीन मिळाला होता. त्यामुळे मी किरणची मनधरणी केलीच असती. असे मजेशीर उत्तर दिले. हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. त्यानंतर अनुपम यांनी आणखी एका किस्सींग सीनची गोष्ट सांगितली. यावेळी अनुपम खेर म्हणाले, एका मुलीला किस करायचा होता. ती आठ महिने थांब म्हणाली, त्यादरम्यान दिग्दर्शकाने मला ग्लासाबरोबर किसींग ची प्रॅक्टीस करायला सांगितली. यावेळी मी काचेचा ग्लास घेऊन किसींग ची प्रॅक्टीस केली, त्यामुळे माझे ओठ सुजले. अनुपम यांनी सांगितलेले हे किस्से ऐकताना प्रेक्षकांमध्ये मात्र जोरदार हशा पिकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -