Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनुपम खेर यांना गंभीर दुखापत

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनुपम खेर यांना गंभीर दुखापत

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांच्याबाबत नुकतीच एक बातमी समोर येत आहे. ‘विजय 69’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत स्वतः त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन माहिती देत एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्यांच्या हाताला प्लास्टर लावलेलं दिसत आहे. शिवाय त्यांच्या हातात त्यांनी पिवळ्या रंगाचा स्पंज बॉल हातात घेतलेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

हा फोटो शेअर करत अनुपम खेर यांनी इंस्टाग्रामवर कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “तुम्ही स्पोर्ट्स फिल्म्स करता आणि तुम्हाला दुखापत होत नाही, हे कसे होऊ शकते? काल ‘विजय 69’ च्या शूटिंगदरम्यान माझ्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. दुखत होते पण तेव्हा खांद्यावर स्लिंग टाकणाऱ्या भावाने सांगितले की, त्याने हे स्लिंगने शाहरुख खान आणि हृतिक रोशनच्या खांद्यावर देखील टाकले होते. मग कळत नाही का वेदना थोडी कमी झाली! तोंडातून थोडीशी किंकाळी नक्कीच येते फोटोत हसण्याचा प्रयत्न करणे योग्यच आहे! एक-दोन दिवसांनंतर शूटिंग सुरू राहील.”

- Advertisement -

दरम्यान, अनुपम खेर यांच्या या पोस्टवर अनेक नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय काहीजण त्यांनी लवकर बरे होण्याचा सल्ला देखील देत आहेत.

या चित्रपटात दिसणार अनुपम खेर

अनुपम खेर यांना ‘द काश्मिर फाईल्स’मुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. ते आगामी काळात विवेक अग्निहोत्रींच्या ‘द वॅक्सीन वॉर’ आणि कंगनाच्या ‘इमर्जन्सी’मध्ये देखील दिसणार आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा  :

प्रमोशनसाठी सारा आणि विक्की पोहोचले राजस्थानात; घेतला चुलीवरच्या भाजी-भाकरीचा आस्वाद

- Advertisment -