Anupama: माधवी गोगटे यांच्या निधनानंतर कलाकरांनी आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

Anupama fame actress madhavi gogate died rupali ganguly and others pay tributes
Anupama: माधवी गोगटे यांच्या निधनानंतर कलाकरांनी आठवणींना उजाळा देत वाहिली श्रद्धांजली

मराठी चित्रपट सृष्टीसह बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे कोरोनामुळे आज निधन झाले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी माधवी यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र माधवी यांच्या अचानक जाण्याने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये शोकाकूळ वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून माधवी यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु होते. मात्र २१ नोव्हेंबरला उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. माधवी यांच्या निधनानंतर हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांकडून त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

अनुपमा मालिकेतील अनुपमा अर्थात अभिनेत्री रुपाली गांगुली हीने माधवी यांच्या जाण्याचा मोठा धक्का घेतला आहे. दु:खात बुडालेल्या रुपाली गांगुलीने इन्स्टाग्रामवर एक मेसेज पोस्ट करत माधवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय माधवी यांची खास मैत्रीण अभिनेत्री नीलू कोहली यांनीही इमोशनल मेसेज शेअर केला आहे.

रुपाली गांगुली यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, खूप काही सांगायचे राहून गेले. सद्गती माधवीजी. अनुपमा या मालिकेत माधवी यांनी पहिल्यांदा अनुपमा यांच्या आईची भूमिका केली होती. मात्र तब्येत खराब होत असल्याने त्यांच्या जागी सविता प्रभु ही भूमिका साकारत आहेत.

कलाकारांकडून वाहिली जातेय श्रद्धांजली

माधवी यांच्या जवळच्या सहकारी आणि त्यांची मैत्रीण नीलू कोहली यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नीलू कोहली यांनी इन्स्टाग्राम पोस्ट करत लिहिले की, माधवी गोगाटे माझी केवळ मैत्रीणचं नव्हती…. मला विश्वासचं बसत नाही तु मला सोडून गेलीस. ह्रदय तुटले, तुझे हे जाण्याचे वय नव्हते. Damn Covid. काश तु माझ्या मेसेजचा रिप्लाय दिला नव्हता तेव्हा मी फोन करुन तुझ्याशी बोलली असती. आत्ता मी फक्त पश्चाताप करु शकते.

माधवी यांनी भ्रमाचा भोपळा, गेला माधव कुणीकडे या नाटकांमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच बॉलीवूड मध्येही काम केले. काही मराठी मालिकांमधूनही त्या घराघरात पोहचल्या. मिसेस तेंडुलकर, कोई अपना सा, ऐसा कभी सोचा न था, तुझ माझ जमतय एक सफर, बसेरा अशा अनेक हिंदी मराठी मलिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोणाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तबेतीत सुधारणा होत असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.