अनुपमा फेम रुपाली गांगुली टेलिव्हिजनवरील सध्याची सर्वांत महागडी अभिनेत्री, दिवसाला घेते ‘इतकं’ मानधन

टेलिव्हिजनवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री मौनी रॉय, हिना खान, गौहर खान, दिव्यांका त्रिपाठी, रश्मी देसाई या अभिनेत्रींची नावे आहेत.

Anupama fame Rupali Ganguly most highest paid actress on television, charged 3 lakh rupees per episode
अनुपमा फेम रुपाली गांगुली टेलिव्हिजनवरील सध्याची सर्वांत महागडी अभिनेत्री, दिवसाला घेते 'इतकं' मानधन

हिंदी टेलिव्हिजनवर सध्या अनुपमा (Anupama)  ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. फार कमी वेळेत अनुपमा मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेत अनुपमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly )  सर्वांची लाडकी अभिनेत्री ठरली आहे. साधी सोज्वळ अनुपमा साकारुन रुपाली टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा ठरली आहे. टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून सध्या रुपली गांगुलीची चर्चा असून ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.

अनुपमा या मालिकेने अभिनेत्री रुपाली गांगुलीला खरी ओळख निर्माण करुन दिली. सध्या रुपाली गांगुलीला अनुपमा नावानेच ओळखले जात आहे. २०२० मध्ये आलेल्या अनुपमा या मालिकेने कुमकुम भाग्य, ये रिश्ता क्या कहलाता है सारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध मालिकांना मागे टाकत आपले नाव पहिला क्रमांकावर लिहिले. त्यामुळेच अभिनेत्री रुपाली गांगुली आज तिच्या कामासाठी सर्वाधिक मानधन घेत आहे.

एका वेबसाइटने दिलेल्या माहिती, दीड लाख रुपयांच्या मानधनावर रुपालीने अनुपमा ही मालिका साइन केली होती. अनुपमाच्या प्रत्येक एपिसोडसाठी रुपाली तीन लाख रुपये मानधन घेते. रुपाली सध्या टेलिव्हिजवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये नंबर एक वर आहे.

अनुपमा मालिकेतील इतर कलाकारांचे मानधन पहायला गेले तर अनुपमाचा नवरा वनराजची भूमिका साकारणारे अभिनेते सुधांशु पांडेय एका एपिसोडसाठी 80 हाजारांहून अधिक मानधन घेतात. तर मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणी काव्या म्हणजेच अभिनेत्री मदालसा शर्मा एक एपिसोडसाठी ४०-५० हजार रुपये मानधन घेते.

टेलिव्हिजनवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री मौनी रॉय, हिना खान, गौहर खान, दिव्यांका त्रिपाठी, रश्मी देसाई या अभिनेत्रींची नावे आहेत. या सर्व अभिनेत्रींना मागे टाकत आता रुपाली गांगुली सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे.


हेही वाचा – यापुढे फक्त कुटुंब प्रधान सिनेमे करणार- रणवीर सिंह