Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अनुराग कश्यपची लेक आलिया ट्रोलर्सची शिकार

अनुराग कश्यपची लेक आलिया ट्रोलर्सची शिकार

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप सोशल मिडियावर अधिक सक्रिय असते. सोशल मिडियाच्या माध्यमातून आलिया आपले नवनवीन फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच इंस्टाग्रामवर आलियाने एक बिकनीवरचा फोटो शेअर केला होता. या फोटोवरुन आलियावर टीकेची झोड उठवली जात आहे. या फोटोवर अनेक युजर्संनी अपमानजनक, आक्षेपार्ह कमेंट केल्या आहेत. आलिया कश्यपचे इंस्टाग्रामवर सध्या २०,००० हून अधिक फॉलोवर्स आहेत. आलियाने याआधीही बिकनीवरचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोवरुनही अनेक युजर्सनी तिच्या फोटोवर अश्लील कमेंटस केल्या होत्या. त्यामुळे आलिया खूप घाबरली होती. एका अंत:वस्त्राच्या ब्राँडच्या प्रमोशनसाठी तिने तो फोटो शेअर केला होता. मात्र या फोटोवर अश्लील, घाणेरड्या कमेंटसचा पूर आला होता. त्यामुळे तिने या बिकनी ब्राँडला आपल्या वेबसाइटवरील फोटो-व्हिडिओ बंद करण्यास सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliyah Kashyap (@aaliyahkashyap)

- Advertisement -

आलिया कश्यपने या सर्व कमेंटसला टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु याघटनेवर व्यक्त होणे गरजेचे समजत आलियाने एक अनुभव शेअर केला आहे. अशा कमेंटस बलात्कारासारख्या प्रवृत्तीला खतपाणी घालत असल्याचे तिचे म्हणणे आहे. याविषयी आलियाने लिहिले आहे की, महिलांना आपल्या कपड्यांकडे लक्ष द्या असे सल्ले देण्यापेक्षा हे महत्त्वाचे आहे की, आपल्या समाजातील सामान्य झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची अशिक्षित पुरुषांना माहिती देणे. हे माझे शरीर आहे, माझे आयुष्य आहे. मला करायचे आहे ते मी निवडले. असे आलिया म्हणाली. अनेकदा आलिया कश्यपच्या वेगवेगळ्या गोष्टींवर निशाणा साधला गेला. २०१९ मध्येही आलिया कश्यपला एका सोशल मिडिया युजर्सने बलात्काराची धमकी दिली होती. यावेळी वडील दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी गुन्हा नोंदवला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliyah Kashyap (@aaliyahkashyap)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliyah Kashyap (@aaliyahkashyap)

- Advertisement -


हेही वाचा- शाहिद कपूर लवकरच ‘छत्रपती शिवाजी महाराजां’च्या भूमिकेत झळकणार?

 

- Advertisement -