‘Sacred Games’ च्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात? अनुराग कश्यपने सांगितले सत्य

या वेबसीरीजच्या तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे.त्यातच दिग्दर्शक अनुराग कश्यप याने सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सेक्रेड गेम्सच्या तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तमाम चाहत्यांसाठी सेक्रेड गेम्सच्या तिसऱ्या सीजनच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र. या व्हायरल होणाऱ्या पोस्टमागे नक्की सत्य काय?याची माहीती अनुराग कश्यप याने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.

anurag kashyap reveals about shootin of the netflix famous webseries sacared games season 3
'Sacred Games' च्या तिसऱ्या सीजनच्या शूटिंगला सुरुवात ? अनुराग कश्यपने सांगितले सत्य

हल्लीच्या युगात करमणूकीची अनेक साधने उद्यास आली असून, नेटफ्लिक्सने तरुणाईला तुफान वेड लावलं आहे. नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’च्या या वेबसीरीजने मोठ्या प्रमाणात धुमाकुळ घातला आहे. सेक्रेड गेम्सच्या सीझन 1 आणि सीझन 2 ने नेटफ्लिक्सप्रेमींनी मोठ्या प्रमाणात पसंती दाखवली. अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची मुख्य भुमिका असलेली ‘सेक्रेड गेम्स’ ही वेबसिरीज लोकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेतली आहे. या वेबसीरीजच्या तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सेक्रेड गेम्सच्या तिसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तमाम चाहत्यांसाठी सेक्रेड गेम्सच्या तिसऱ्या सीजनच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र. या व्हायरल होणाऱ्या पोस्टमागे नक्की सत्य काय? याची माहीती अनुराग कश्यप याने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

वास्तविक वेबसिरीजच्या मेकर्सने तिसरा सीझन येणार नाही. अशी घोषणा केली होती. मात्र, अनेक चाहते या सेक्रेड गेम्सच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. त्यातच काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती. या व्हायरल पोस्टमध्ये असे लिहिले होते की, या वेबसीरीजचे तिसऱ्या सीझनसाठी कास्टींगला सुरुवात झाली आहे. मात्र, या पोस्टमागे नेमके सत्य काय आहे ? याचा खुलासा दिग्दर्शक अनुराग कश्यप यांने केला आहे. अनुरागने या पोस्टचा स्क्रीनशॉर्ट सोशल मिडियावर शेअर करत ही पोस्ट एक अफवा असल्याचे त्याने सांगितले आहे.

कृपया rajbeer_casting या पेजला रिपोर्ट करा. याशिवाय हा व्यक्ती स्कॅमर आहे. मी त्याच्या विरोधात एफआयआर नोंदवली आहे. अशा आशयाचे कॅप्शन अनुराग कश्यप याने दिले आहे. त्याचबरोबर या सेक्रेड गेम्स सिझन – 3 या वेबसीरीजचे कास्टींग आणि शूटिंग होणार नाही,असेही त्याने स्पष्ट केले आहे.

सेक्रेड गेम्स हे एक क्राइम थ्रिलर वेबसीरीज आहे. सेक्रेड गेम्सचा पहिला सीझन 2018 मध्ये रीलीज करण्यात आला होता. या वेबसीरीजवर चाहत्यांनी अमाप प्रेम केले असून, सीरीजमधील ‘गणेश गायतोंडे’ ही भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. याशिवाय या सेक्रेड गेम्स सीरीजचे अनेक डायलॉग हे प्रेक्षकांच्या तोंडपाठ झाले असून, दैनंदिन आयुष्यात चाहते या डायलॉगचा सर्रास वापर करताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर 2019 मध्ये सीरीजचा दुसरा सीझन रीलीज करण्यात आला. ही सीरीज अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि नीरज गायवान यांनी दिग्दर्शित केले आहे.


हेही वाचा – Lata Mangeshkar Health Update: लतादीदींच्या प्रकृतीसाठी मंगेशकर कुटुंबियांचे देवाला साकडे