घरताज्या घडामोडी'मी या बाईला अजिबात ओळखत नाही', अनुरागचा कंगनावर निशाणा!

‘मी या बाईला अजिबात ओळखत नाही’, अनुरागचा कंगनावर निशाणा!

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका होत आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. नुकतीच एका मुलाखतीत तापसी पन्नूबरोबर घेतलेला पंगाही सध्या चर्चेत आहे. मात्र या सगळ्यात दिग्दर्शक अनुराग कश्यपने उडी घेतली आहे.

- Advertisement -

दिग्दर्शक अनुराग कश्यप याने कंगनावर निशाणा साधला आहे. ही बाई प्रसिद्धीसाठी आता काहीही बोलतेय, असं म्हणत त्याने टीका केली आहे. अनुराग कश्यप आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “काल कंगनाची एक मुलाखत पाहिली. कधी काळी ती माझी खुप चांगली मैत्रीण होती. मला प्रोत्साहन द्यायची. पण या नव्या कंगनाला मी ओळखत नाही. तिची मुलाखत पाहून मला धक्काच बसला.” अशा आशयाचं ट्विट अनुरागने केलं आहे.

- Advertisement -

त्यानंतर अनुरागने आणखी एक ट्विट करत म्हटलं आहे की,  “कंगनाच्या फॉलोअर्सने तिला आरसा दाखवायला हवा. ती आता काहीही बोलतेय. तिच्या बोलण्यामध्ये काहीही तथ्य नाही. याचा शेवट इथेच होणार. खऱ्या कंगनाला मी ओळखतो त्यामुळे या नव्या कंगनाकडे मला आता पाहवत नाही.”

आता अनुराग कश्यप यांनी केलेल्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.


हे ही वाचा – नोकरीची संधी: ३० हजार मानधनावर कोव्हिड योध्दा म्हणून काम करता येणार!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -