घरमनोरंजनतापसी पन्नू अभिनित अनुराग कश्यपच्या 'दोबारा'चा 23 जून रोजी लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये...

तापसी पन्नू अभिनित अनुराग कश्यपच्या ‘दोबारा’चा 23 जून रोजी लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार प्रीमियर!

Subscribe

दिग्दर्शक-अभिनेता जोडी 23 जून, संध्याकाळी 6 वाजता #LIFF2022 ओपनिंग नाईट गालामध्ये चित्रपट सादर करणार आहेत

एकता आर कपूर आणि अनुराग कश्यप यांचा बहुप्रतिक्षित नवीन काळातील थ्रिलर ‘दोबारा’ 19 ऑगस्ट 2022 ला प्रदर्शित होत आहे. यात आणखी रोमहर्षकता आणत, तापसी पन्नू अभिनित लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे. दिग्दर्शक-अभिनेता जोडी 23 जून, संध्याकाळी 6 वाजता #LIFF2022 ओपनिंग नाईट गालामध्ये चित्रपट सादर करणार आहेत.

पुरस्कार विजेती अभिनेत्री तापसी पन्नू अभिनित या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केले आहे आणि शोभा कपूर आणि एकता आर कपूर (कल्ट मूव्हीज, बालाजी टेलिफिल्म्स अंतर्गत नवीन शाखा) आणि सुनीर खेतरपाल आणि गौरव बोस (एथेना) यांनी याची निर्मिती केली आहे.

- Advertisement -

 दोबारा हा नव्या जमान्यातील थ्रिलरपट असून यामध्ये तापसी आणि अनुराग तिसऱ्यांदा एकत्र येत आहेत. दोबारासोबत, तापसी आणि पावेल गुलाटी यांची हिट जोडी थप्पडच्या जबरदस्त यशानंतर पुन्हा एकत्र दिसणार आहे.दोबारा, बालाजी मोशन पिक्चर्स, कल्ट मूव्हीजच्या नवीन विभागातील पहिला चित्रपट असून, आकर्षक, वेगवान आणि शैलीदार कथा सांगतो. हा चित्रपट 19 ऑगस्ट 2022 रोजी जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -