लग्नाआधीच आई? अनुषाने सांगितले व्हायरल फोटोमागचं सत्य

प्रसिद्ध व्हिडिओ जॉकी (Video Jockey) आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) हिने शुक्रवारी एका बाळासोबतचा फोटो पोस्ट करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. ती लग्नाआधीच आई बनल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच, तिने हे बाळ दत्तक  (Adopt) घेतले असल्याचंही काहीजण म्हणाले. अनेक सेलिब्रिटींनीही (Celebrities) तिच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव केल्याने नेटीझन्सनेही हे बाळ अनुषाचेच असल्याचे मानले. मात्र, अनुषाने आता यावर खुलासा केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट करून या बाळाची ती गॉड मदर (God Mother) असल्याचं तिनं म्हटलं आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये (Instagram) अनुषा म्हणते की, या बाळाची खरी आई जोहा आहे आणि संगीता काकी या बाळाची आजी आहे. जोहा माझी चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे सहाराची मी गॉड मदर आहे. म्हणजेच, जोहा आणि सहारा यांना माझी केव्हाही गरज लागली तर मी नेहमी त्यांच्यासाठी सदैव तत्पर असेन.

तिने इन्स्टाग्राम स्टोरी टाकून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मात्र, सहारा आणि अनुषाचे फोटो फार गोड होते. त्यामुळे फोटोमधील त्या दोघांची केमिस्ट्री पाहता हे बाळ अनुषाचेच असल्याचे सर्वांना वाटत होते.

दरम्यान, अनुषा आणि करण कुंद्रा यांचं अफेअर तुफान गाजलं होतं. तब्बल सहा वर्ष हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र करणने फसवल्याचा आरोप करत अनुषाने त्याच्यासोबत ब्रेकअप केलं. त्याच्यासोबत ब्रेकअप केल्यानंतर अनुषा आता ब्रिटिश-इंडियन अॅक्टर जेसन शाह याला डेट करत आहे.