अनुष्का आणि विराट लवकरच सुरू करणार बँड; फोटो शेअर करत अनुष्काने दिली माहिती

हा फोटो शेअर करत अनुष्काने खाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मला नेहमीच या क्यूट मुलासोबत एक बँड सुरू करायचा होता." पावर कपल विरूष्काच्या या फोटोंवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हे पति-पत्नी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगीरी केल्यानंतर आता लवकरच एक बँड सुरू करणार आहेत. अनुष्काने तिच्या सोशल मीडियावर यासंबंधीत एक फोटो शेअर करत याची घोषणा केली आहे. अनुष्काच्या मते, ती नेहमीच एका सुंदर मुलासोबत बँड बनावयाचा होता.

विराट-अनुष्का सुरू करणार बँड?
विराट आणि अनुष्का आपल्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच पर्सनल आयुष्यसुद्धा खूप एन्जॉय करत असतात. दरम्यान आता अनुष्काने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर २ फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये अनुष्का आणि विराटने एकाच पांढरा टी-शर्ट आणि त्यावर सेम स्काय ब्लू रंगाचं जॅकेट घातलेले आहे. शिवाय दोघेही या फोटोमध्ये मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

हा फोटो शेअर करत अनुष्काने खाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, “मला नेहमीच या क्यूट मुलासोबत एक बँड सुरू करायचा होता.” पावर कपल विरूष्काच्या या फोटोंवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत. या दोघांचे हे फोटो कोणत्यातरी प्रोजेक्टच्या शूटिंग सेटवरील असल्याचं दिसून येत आहे.

‘चकदा एक्सप्रेस’ मध्ये दिसणार अनुष्का शर्मा
दरम्यान, येत्या काळात अनुष्का ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या बायोपिकमध्ये अनुष्का माजी भारतीय क्रिकेटर झूलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे.’चकदा एक्सप्रेस’च्या माध्यामातून अनुष्का जवळपास चार वर्षानंतर चित्रपटात परतत आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ २ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :‘ब्रह्मास्त्र’मधील ‘देवा देवा’ गाण्याचा टीझर रिलीज