बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली अनेकदा त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात. अशातच मागील काही दिवसांपासून हे दोघेही पुन्हा एकदा आई-वडील होणार असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत या दोघांनी कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. पण लवकरच ते याबाबत घोषणा करतील असं म्हटलं जात आहे.
व्हायरल व्हिडीओमुळे होतेय चर्चा
View this post on Instagram
येत्या 12 नोव्हेंबर रोजी बंगुळुरुमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा विश्वचषक सामना पार पडणार आहे. हा सामना नेदरलँड्ससोबत होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी नुकतीच अनुष्का शर्मा देखील पोहोचली. यावेळचा बंगळुरूच्या एका हॉटेलमधील विराट आणि अनुष्काचा एकत्र फिरताना एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघेही हातात हात घालून फिरताना दिसत आहेत.या व्हिडीओ अनुष्का काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. ज्यातून तिचे बेबी बंप दिसत असल्याचं अनेकजण म्हणत आहेत.
मागील काही दिवसांपर्वी देखील अनुष्काच्या प्रेग्नेंसीची चर्चा सुरु होती. त्यावेळी अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला एका मॅटरनिटी क्लिनिकबाहेर स्पॉट करण्यात आलं. यावेळी त्यांनी पापाराझींना हे फोटो शेअर न करण्याची विनंती केली. तसंच लवकरच ते स्वतः ही बातमी जाहीर करतील. असं ते म्हणाले होते.
2021 मध्ये दिला होता मुलीला जन्म
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे आधीच एका मुलीचे पालक आहेत. अनुष्काने जानेवारी 2021 मध्ये त्यांची मुलगी वामिकाला जन्म दिला होता. त्यावेळी देखील अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या इंस्टाग्राम फोटोंद्वारे याची घोषणा केली होती.
हेही वाचा :