अनुष्काने घातलेल्या ‘निओन ग्रीन मोनोकनीची’ किंमत वाचून व्हाल हैराण

डिझायनर कपड्यात अनुष्का सुंदर दिसतेच मात्र यावेळी स्विमसूटमध्ये देखील अनुष्काचे ग्लॅमर दिसून आले आहे.

anushka sharma share her neon green monokini bold photos
अनुष्काने घातलेल्या 'निओन ग्रीन मोनोकनीची' किंमत वाचून व्हाल हैराण

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या एका फोटोमुळे चांगलीच चर्चेत आहे. अनुष्का शर्मा अनेक दिवसांनी बोल्ड अंदाजात दिसली आहे. अनुष्काच्या या फोटोंवर विराट कोहली देखील फिदा झाला आहे. अनुष्काने नुकताच निओन ग्रीन कलरची मोनोकनीमधले तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ज्यावर विराटने देखील प्रेमाचा वर्षाव केलाय. त्याचप्रमाणे अनुष्काच्या फॅन्सनी देखील तिच्या या फोटोंना पसंती दिली आहे. गेल्या काही तासांमध्ये अनुष्काचे बिकीनीमधील  हे फोटो सर्वाधिक वेळा पाहिले गेलेले फोटो आहेत. अनुष्कावर ही ग्रीन मोनोकनी फार सुंदर दिसतेय. निऑन ग्रीन मोनोकनी पाहूनच अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि या निऑन ग्रीन मोनोकनीची किंमत देखील समोर आली आहे जी पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काने घातलेली निऑन ग्रीन मोनोकनी ही न्यूयॉर्कच्या बेस्ट ब्रँड solid and stripedची आहे. याची किंमत ११९USD म्हणजेच ८,८६० रुपये इतकी आहे. या मोनोकनीचे नाव Anne Marie बटन असे आहे. ही मोनोकनीच्या स्टायलीश डिझाइनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. डीप यू नेकलाइन,ब्रॉड स्ट्रेप्स,रिब्ड डिटेल्स,व्हाइट अप फ्रंट बटन या स्टायलीश डिझाइनमुळे निऑन ग्रीन मोनोकनी सर्वांच्या पसंतीस उतरली आहे.

अनुष्का या निऑन ग्रीन मोनोकनीमध्ये फार कम्फर्टेबल दिसत आहे. निऑन ग्रीन मोनोकनी घालून अनुष्का मस्त रिलॅक्स होताना दिसत आहे. स्माइल पोज देत अनुष्काचे सौदर्य कॅमेरात टिपण्यात आले आहे.

अनुष्का नेहमीच तिच्या ग्लॅमरमुळे सर्वांची आवडती आहे. डिझायनर कपड्यात अनुष्का सुंदर दिसतेच मात्र यावेळी स्विमसूटमध्ये देखील अनुष्काचे ग्लॅमर दिसून आले आहे. अनुष्काच्या फोटोंनी तिने केवळ विराटच नाही तर अनेक सेलिब्रेंटीना फिदा केले आहे.

अनुष्काने जानेवारी महिन्यात वामिकाला जन्म दिला. त्यानंतर अनुष्काचे वजन वाढले होते. मात्र ती फिटनेस फ्रिक असल्याने तिने स्वत:ला फिट ठेवले आहे. निऑन ग्रीन मोनोकनीमधल्या फोटोंमध्ये अनुष्का एका मुलीची आई असल्याचे वाटत देखील नाही.


हेही वाचा –  Smriti Iraniचे वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन पाहून फॅन्स हैराण, पहा फोटो