अनुष्काने शेअर केला वामिकाचा विराटसोबत खेळतानाचा फोटो, पहा कशी दिसतेय विरुष्काची लेक

फोटो पाहून चाहत्यांनी पुन्हा वामिकाचा चेहरा पाहण्याची इच्छा दर्शवली आहे

Anushka sharma shared photo of Vamika playing with Virat kohli
अनुष्काने शेअर केला वामिकाचा विराटसोबत खेळतानाचा फोटो, पहा कशी दिसतेय विरुष्काची लेक

बॉलिवूडची लाडकी जोडी म्हणजेच विरुष्का (Virushka) दोघेही सध्या मुलगी वामिकासोबत (Vamika) क्वालिटी टाइम स्पेंड करत आहेत. पुन्हा एकदा विरुष्काच्या लेकीची फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अनुष्का आणि विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या परफेक्ट फॅमिलीचा फोटो शेअर केला आहे. विरुष्काच्या मुलीला पाहण्यासाठी चाहते खूप आतूर आहेत. अनुष्का नेहमी वामिकाचे फोटो शेअर करत असते ज्यात वामिकाची लहानशी झलक पहायला मिळत असते. अनुष्काने विराट आणि वामिका एकमेकांसोबत खेळत असतानाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काने पती विराट कोहलीचा लेक वामिकासोबचा खेळतानाचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात वामिका प्ले एरीयामध्ये मांडी घालून बसली असून विराट तिच्यासोबत खेळताना दिसत आहे. फोटोमध्ये वामिका पाठमोरी बसलेली असून तिने छान दोन बो घातले आहेत. ‘एका फ्रेममध्ये माझे दोन जीव आहेत’, असे म्हणत अनुष्काने हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहत्यांनी पुन्हा वामिकाचा चेहरा पाहण्याची इच्छा दर्शवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काने शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत ३ करोडहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. याआधी देखील अनुष्काने वामिकाचे काही फोटो शेअर केले होते. मात्र आतापर्यंत एकाही फोटोमध्ये तिने वामिकाचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. अनुष्काने या आधी वामिकाचा फोटो शेअर करत, तिच्या एका हास्यात आमचं सगळं जग बदलून जाऊ शकते. मला खात्री आहे आम्ही तिच्या प्रेमासाठी खरे उतरू,असे म्हणत वामिकासोबतचा एक फोटो शेअर केला होता. तसेच माझी छोटी असे देखील अनुष्काने म्हटले होते.


हेही वाचा – Happy Birthday Swapnil Joshi: काय सांगता! श्रीकृष्णाच्या भूमिकेनंतर लोक स्वप्निलच्या पाया पडायचे, वाचा धम्माल किस्सा