घरमनोरंजन'चाकदा एक्सप्रेस'साठी Anushka Sharma करतेय गोलंदाजीचा सराव

‘चाकदा एक्सप्रेस’साठी Anushka Sharma करतेय गोलंदाजीचा सराव

Subscribe

बऱ्याच माहिन्यांपासून चाहते अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आगामी चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. अशातच अनुष्का पुन्हा एकदा बिग स्क्रीनवर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. अनुष्का आता ‘चाकदा एक्सप्रेस’ (Chakda Express) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताची प्रसिद्ध महिला क्रिकेटपटू झूलन गोस्वामीच्या जीवन आणि क्रिकेट प्रवासावर आधारित हा चित्रपट आहे. यात अनुष्का स्वत: झुलन गोस्वामीची भूमिका साकारणार आहे. यावर्षी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्याची शक्यता आहे.

या भूमिकेसाठी अनुष्का फार मेहनत घेत आहे. झुलनच्या गोलंदाजीची स्टाईल आणि व्यक्तिमत्त्व हुबेहूब पडद्यावर दिसण्यासाठी अनुष्का सध्या नेटमध्ये मेहनत घेतेय. याचे काही फोटो अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या फोटोंमधून तरी अनुष्का चित्रपटासाठी मैदानात खूप मेहनत करत असल्याचे दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

- Advertisement -

एका फोटोमध्ये अनुष्काने चेंडूवर ग्रीप पकडल्याचे दिसतेय. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ती गॉगल घालून मैदानात गोलंदाजी करतेय. अनुष्काने या फोटोंना ‘ग्रीप बाय ग्रीप’, चाकदा एक्सप्रेसची तयारी अशी कॅप्शन दिली आहे. या फोटोवर  झुलन गोस्वामीने सुद्धा ‘व्हेरी नाइस’ अशी कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

- Advertisement -

या चित्रपटात प्रेक्षकांना झुलन गोस्वामीचा आयुष्यात संघर्ष, यश, आणि एकूणचं जीवनप्रवास कसा होता हे पाहायला मिळणार आहे. 2022 च्या सुरुवातीला अनुष्काने या चित्रपटाची घोषणा केली होती. ‘चाकदा एक्सप्रेस’मुळे अनुष्का शर्मा मोठ्या ब्रेकनंतर बिग स्क्रीनवर झळकरणार आहे. त्यामुळे अनुष्काला नव्या अंदाजात पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.

‘चाकदा एक्सप्रेस’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यासाठी अनुष्का जवळपास महिनाभर इंग्लंडमध्ये शूटिंग करणार आहे. या चित्रपटाची निर्मिती क्लीन स्लेट प्रॉडक्शन हाऊस करत आहे. याआधीही भारतातील अनेक खेळाडूंवर चित्रपट रिलीज झाले आहेत. यामध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, बॉक्सर मेरी कोम, अॅथलीट मिल्खा सिंग यांच्या नावांचा समावेश आहे.

मात्र या खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावे तसे कमाल करु शकले नाहीत. धोनी द अनटोल्ड स्टोरी व्यतिरिक्त भाग मिल्खा भाग, मेरी कॉम आणि 83 सारख्या चित्रपटांनी अपेक्षे इतकी कमाई केली नाही.

अनुष्काने याआधीही या चित्रपटाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. झुलन ही वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. आतापर्यंत तिने 240 विकेट्स घेतल्या आहेत. झुलन ही विश्वचषकात 250 बळींचा टप्पा गाठत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी पहिली महिला खेळाडू आहे.

अनुष्काने यापूर्वी या चित्रपटाची घोषणा करताना म्हटले होते की, हा चित्रपट तिच्यासाठी खूप खास आहे. ही एक त्यागाची गोष्ट आहे. भारताची माजी कर्णधार झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर प्रेरित होऊन हा चित्रपट तयार करण्यात येत आहे. महिला क्रिकेटबद्दल डोळे उघडणारा हा चित्रपट ठरेल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -