घरमनोरंजनLockDown: अनुष्काची 'ही' वेबसीरिज येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; टीजर लाँच

LockDown: अनुष्काची ‘ही’ वेबसीरिज येतेय प्रेक्षकांच्या भेटीला; टीजर लाँच

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची निर्मिती असलेली पाताल लोक ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची पाताल लोक ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसीरिजचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून ही सीरिज प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर पुढील महिन्यात १५ मेपासून पाहता येणार आहे. क्लीन स्लेट फिल्म्स निर्मित या वेबसीरिजची अभिनेत्री अनुष्का शर्मा ही निर्माती असून या निमित्ताने तिने वेबसीरिजच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. प्रदर्शित झालेल्या टीजरमध्ये एका शांत जगाची सफर प्रेक्षकांना घडवण्यात आली आहे.

- Advertisement -

रहस्य, ड्रामा, थरार याचा अनुभव पाताल लोकचा टीजर पाहून येतो. स्वर्ग लोक, पाताल लोक आणि पृथ्वी लोक अशा प्राचीन क्षेत्रांचा प्रवास या वेबसीरिजमध्ये घडवला जात आहे.

- Advertisement -

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे कोणत्याही चित्रपट, मालिकांचे शूटिंग होत नसून त्यामुळे कोणते चित्रपटही प्रदर्शित होत नाहीत. मात्र अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, झी ५ सारख्या डिजिटल माध्यमातून प्रेक्षकांना मनोरंजनाची साधने उपलब्ध होत आहेत. शिवाय काही हिंदी चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर आता अनुष्का शर्मा पाताल लोकच्या माध्यमातून डिजिटल क्षेत्रातही पदार्पण करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीदेखील ही सीरिज पाहण्याची उत्सुकता हा टीजर पाहिल्यानंतर वाढली असणार यात शंका नाही.

हेही वाचा –

सरकारचा मोठा निर्णय: कोरोनाच्या सर्व चाचण्या होणार मोफत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -